India-Nepal Relations: नेपाळमध्ये ‘बालेन पर्व’ सुरू होताच भारत-नेपाळ मैत्रीत मिठाचा खडा; 45 दिवसांत भारताविरोधी घेतले ‘हे’ मोठे निर्णय

काठमांडूचे महापौर असताना 'आदिपुरुष' वादातून चर्चेत आलेले बालेन आता पंतप्रधान म्हणून भारतासमोर नवी राजनैतिक संकटे उभी करत आहेत.<br/>

India-Nepal Relations: नेपाळमध्ये ‘बालेन पर्व’ सुरू होताच भारत-नेपाळ मैत्रीत मिठाचा खडा; 45 दिवसांत भारताविरोधी घेतले ‘हे’ मोठे निर्णय

India-Nepal Relations: भारताचा मित्र मानल्या जाणाऱ्या नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर आता दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. 27 मार्च रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेले बालेन शाह (Balen Shah) यांनी अवघ्या दीड महिन्यात आपल्या भारतविरोधी धोरणांचे दर्शन घडवले आहे. काठमांडूचे महापौर असताना 'आदिपुरुष' वादातून चर्चेत आलेले बालेन आता पंतप्रधान म्हणून भारतासमोर नवी राजनैतिक संकटे उभी करत आहेत.

बालेन शाह यांचे 4 धक्कादायक निर्णय – 

1. भारतीय राजनैतिक शिष्टाचाराचा अपमान:
भारत-नेपाळमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नेपाळ दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पंतप्रधान बालेन शाह यांनी "मी केवळ माझ्या दर्जाच्या नेत्यालाच (पंतप्रधानांना) भेटेन," असे सांगत भारतीय परराष्ट्र सचिवांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. आंतरराष्ट्रीय राजकारणात ही बाब भारताचा अपमान मानली जात असून, यामुळे दोन्ही देशांतील संवाद थांबला आहे.

2. सीमावादाची जुनी जखम पुन्हा ताजी 
केपी शर्मा ओली यांच्या काळातील वादग्रस्त नकाशाचा मुद्दा बालेन यांनी पुन्हा एकदा उकरून काढला आहे. लिपुलेख आणि कालापानी या भारतीय क्षेत्रांवर चीनच्या पाठबळाने दावा सांगत त्यांनी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे. मानसरोवर यात्रेच्या मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी सीमावर्ती भागात तणाव वाढवला आहे.

3. सीमेवरील मधेसी बांधवांची आर्थिक नाकेबंदी:
नेपाळमधील महागाईमुळे तराई प्रदेशातील नागरिक दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी भारतावर अवलंबून असतात. मात्र, बालेन सरकारने आता 100 रुपयांहून अधिक मूल्याच्या वस्तू भारतातून नेपाळमध्ये नेल्यास त्यावर 'कस्टम ड्युटी' (सीमा शुल्क) लागू केली आहे. या जाचक नियमामुळे सीमेवरील गरिबांचे हाल होत असून जनसामान्यांमध्ये संताप आहे.

4. 'ओपन बॉर्डर' धोरणाला सुरुंग:
भारत आणि नेपाळमधील 1751 किमीची सीमा ही वर्षानुवर्षे 'खुल्या सीमे'चे प्रतीक राहिली आहे. मात्र, आता बालेन सरकारने भारतीय नागरिकांसाठी ओळखपत्र अनिवार्य केले असून कडक सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. यामुळे पर्यटनावर आणि व्यापारावर मोठा परिणाम झाला असून, यामागे भारताची कोंडी करण्याचाच राजकीय उद्देश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा – Hantavirus: नव्या विषाणूमुळे जगभरात चिंता! 2 भारतीयांना हंताव्हायरसची लागण; उपचारासाठी थेट नेदरलँड्सला हलवलं

बालेन यांची पार्श्वभूमी
पेशाने इंजिनिअर आणि रॅपर असलेले बालेन शाह तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र, 2022 मध्ये त्यांनी 'बृहत्तर नेपाळ'चा (Greater Nepal) नकाशा प्रसिद्ध केला होता, ज्यात भारताचे काही भूभाग नेपाळमध्ये दाखवले होते. सत्तेत आल्यावर तेच जुने अजेंडे आता ते अधिक आक्रमकपणे राबवत असल्याचे दिसत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number