UPPSC RO ARO Mains Exam 2025: उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) पुनरावलोकन अधिकारी (RO) आणि सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी (ARO) पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवार केवळ प्राथमिक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइट uppsc.up.nic.in वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. आयोगाने सांगितले आहे की, अर्ज प्रक्रियेत उशीर करू नये, कारण हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे. उमेदवारांनी अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवावीत, ज्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि अन्य आवश्यक दस्तऐवज यांचा समावेश असेल. अर्ज पोचवण्याचा पत्ता: सचिव, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (परीक्षा-04 विभाग), 10-कस्तुरबा गांधी मार्ग, प्रयागराज, पिन कोड-211018. तसेच उमेदवार प्रत्यक्ष आयोगाच्या गेट क्रमांक 3 वर येऊनही अर्ज सादर करू शकतात.
हेही वाचा –MBBS Seats: मोठी बातमी! 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी देशभरात 10,650 नवीन MBBS जागांना मंजुरी
एकूण पदांची संख्या आणि पात्र उमेदवार
मुख्य परीक्षेद्वारे एकूण 419 पदे भरली जाणार आहेत. अलीकडेच 16 ऑक्टोबर 2025 रोजी प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, 74,555 उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस –
UPPSC वेबसाइटला भेट द्या: uppsc.up.nic.in
होमपेजवरील लिंकवर क्लिक करा: पुनरावलोकन अधिकारी/सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी (मुख्य परीक्षा) 2023
नवीन उमेदवारांनी प्रथम नोंदणी करावी.
नोंदणीनंतर मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरा. नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता इत्यादी.
विहित अर्ज शुल्क भरा.
अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट घ्या आणि सुरक्षित ठेवा. तथापी, अधिक माहितीसाठी उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.