Apple's 5th Store in India : अमेरिकेची आयफोन (iPhone) उत्पादक कंपनी ॲपलने (Apple) भारतात आपली किरकोळ विक्री आणखी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कंपनी 11 डिसेंबर रोजी भारतातील 5 वे स्टोअर सुरू करत आहे. हे नवे ॲपल स्टोअर नोएडामध्ये डीएलएफ मॉल ऑफ इंडिया (DLF Mall of India) येथे उघडले जाणार आहे. 'देशातील ॲपलच्या चालू असलेल्या रिटेल विस्तारातील (Apple iphone Retail Expansion) हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे,' असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे नोएडामधील ग्राहकांना ॲपलची उत्पादने खरेदी करण्यासाठी आणि कंपनीच्या उत्कृष्ट सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी संधी मिळणार आहे.
भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याच्या थीमवर सजावट
कंपनीच्या निवेदनानुसार, या नवीन स्टोअरमुळे नोएडा येथील ग्राहकांना ॲपलची उत्पादने (Products) पाहण्याची, खरेदी करण्याची आणि कंपनीच्या उत्कृष्ट सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची नवीन संधी मिळेल. या स्टोअरची घोषणा करताना लावण्यात आलेली बॅरिकेड्स भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या (Peacock) प्रेरणादायी, चमकदार पिसांनी सजवलेली होती. मोर हे अभिमान आणि सर्जनशीलतेचे चिरंजीव प्रतीक आहे.
हेही वाचा – Black Friday Sale: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जबरदस्त ऑफर्स
नाविन्य आणि सर्जनशीलतेचा अनुभव
'नोएडा शहर हे डिझाइन आणि महत्त्वाकांक्षेसाठी ओळखले जाते, तसेच ते नाविन्य आणि मूळ विचारांचे केंद्र आहे,' असे अॅपलने म्हटले आहे. 'ॲपल नोएडा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्साह आणि कौशल्यामुळे ग्राहकांना ॲपलसोबत नवीन गोष्टी शिकता येतील, निर्मिती करता येईल आणि प्रगती करता येईल. येथे ग्राहक आयफोन 17 सह नवीनतम उत्पादनांची संपूर्ण लाइनअप पाहू शकतील आणि तज्ञांकडून समर्थन घेऊ शकतील. तसेच, 'टुडे ॲट ॲपल' (Today at Apple) या विनामूल्य दैनिक सत्रांमध्ये भाग घेऊन छायाचित्रण, कला, संगीत आणि कोडिंगमध्ये शिक्षण आणि सर्जनशीलता वाढवण्याची संधी मिळेल,' असेही 'ॲपल'ने म्हटले आहे.
'ॲपल'ची भारतीय ग्राहकांना बांधिलकी
ॲपलने बंगळूरु (Bengaluru) येथील ॲपल हेब्बाळ आणि पुणे (Pune) येथील ॲपल कोरेगाव पार्क स्टोअरच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या उद्घाटनावेळी मोराच्या थीमवर आधारित लाँच मोहीम सुरू केली होती. तीच आता नोएडा येथेही आणली गेली आहे. ऑनलाईन ॲपल स्टोअर, व्हिडिओद्वारे शॉप विथ अ स्पेशालिस्ट (Shop with a Specialist) आणि ॲपल स्टोअर ॲप (App) या सेवांसह, किरकोळ विक्रीची ही वाढती ठिकाणे ही कंपनीच्या व्यवसायाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असल्याचे 'ॲपल'चे म्हणणे आहे.