Sheikh Hasina Sentence: शेख हसिना यांना बांगलादेश न्यायालयाकडून आणखी एक धक्का; भ्रष्टाचाराच्या तीन प्रकरणांत 21 वर्षांची शिक्षा

ढाक्यातील न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या तीन स्वतंत्र भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये एकूण 21 वर्षांच्या शिक्षेचा निर्णय सुनावला आहे.

Sheikh Hasina Sentence: शेख हसिना यांना बांगलादेश न्यायालयाकडून आणखी एक धक्का; भ्रष्टाचाराच्या तीन प्रकरणांत 21 वर्षांची शिक्षा

Sheikh Hasina Sentence: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या वरिष्ठ नेत्या शेख हसिना यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ढाक्यातील न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या तीन स्वतंत्र भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये एकूण 21 वर्षांच्या शिक्षेचा निर्णय सुनावला आहे. विशेष म्हणजे, शेख हसिना सध्या भारतात असल्याने त्या बांगलादेशात परत येईपर्यंत ही शिक्षा अमलात आणता येणार नाही. त्यांच्याविरुद्धच्या न्यायालयीन कारवाईची ही सलग दुसरी मोठी पायरी आहे.

मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये आधीच मृत्युदंड

यापूर्वी, 17 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायाधिकरणाने शेख हसिनांना त्यांच्या सरकारविरुद्ध गेल्या वर्षी झालेल्या तीव्र आंदोलनांच्या काळात झालेल्या हिंसाचारात “मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यां”साठी मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. महिन्याभर चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 78 वर्षीय हसिना यांना निदर्शने दडपण्यासाठी घडवून आणलेल्या हिंसक दडपशाहीच्या ‘सूत्रधार’ म्हणून दोषी ठरवले होते.

हेही वाचा – Sri Lanka Floods: श्रीलंकेला पूर व भूस्खलनाचा तडाखा ! 31 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

अवामी लीगचा आरोप 

अवामी लीग पक्षाने न्यायाधिकरणाचा निर्णय पूर्णपणे नाकारला आहे. त्यांचा आरोप असा की, हा निर्णय मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारकडून रचलेल्या राजकीय डावाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांपूर्वी हसिनांना बाजूला करण्याचा आहे. 

हेही वाचा – Imran Khan : इम्रान खान यांची अवस्था नक्की कशी? तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितली संपूर्ण माहिती

देशभर निदर्शने, युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी

शिक्षेविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत अवामी लीगने हा निकाल “गैरकायदेशीर” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्षाने मृत्युदंडाच्या निषेधार्थ 30 नोव्हेंबरपर्यंत देशभर मोर्चे आणि आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर बांगलादेशात राजकीय अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number