Anil Kapoor : अनिल कपूर यांचा Jio Hotstar ला 24 तासांचा अल्टिमेटम; इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ

अनिल कपूर यांनी ही पोस्ट शेअर करताना जे कॅप्शन दिले आहे, ते पाहून चाहते चक्रावून गेले आहेत. हा काय प्रकार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Anil Kapoor : अनिल कपूर यांचा Jio Hotstar ला 24 तासांचा अल्टिमेटम; इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ

Anil Kapoor Instagram Post against Jio Hotstar : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनिल कपूर यांनी थेट ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जियो हॉटस्टार’ला (Jio Hotstar) उद्देशून धमकी वजा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जियो हॉटस्टार, तुमच्याकडे 24 तास आहेत!” ही पोस्ट पाहताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून, नेमकं काय घडलंय याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“प्रकरण हातात घेईन!”; अभिनेत्याचा इशारा
अनिल कपूर यांनी ही पोस्ट शेअर करताना जे कॅप्शन दिले आहे, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी लिहिले की, ‘नाहीतर मी हे संपूर्ण प्रकरण स्वतःच्या हातात घेईन.’ अभिनेत्याचा हा उग्र अवतार पाहून चाहते चक्रावून गेले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स करत असा अंदाज वर्तवला आहे की, हा त्यांच्या आगामी एखाद्या प्रोजेक्टच्या प्रमोशनचा भाग असू शकतो. तरीही, 24 तासांचा अल्टिमेटम दिल्याने सर्वांच्या नजरा आता उद्याच्या घडामोडींकडे लागल्या आहेत.

हेही वाचा – Thalapathy Vijay Divorce Controversy: ‘माझ्या विरोधात कट रचला, अनेक वर्षे थांबून…’; भर सभेत थलपथी विजयचा आरोप; घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला अभिनेता

प्रमोशन की खरंच वाद?
अनिल कपूर सध्या त्यांच्या ‘सुभेदार’ (Subedaar) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत, जो नुकताच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. अशातच जियो हॉटस्टारला मिळालेली ही उघड धमकी म्हणजे त्यांच्या नवीन वेब सीरिज किंवा चित्रपटाचे मार्केटिंग ‘गिमिक’ असू शकते, असा कयास लावला जात आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी अशा प्रकारे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, अभिनेत्याने सरेआम धमकी दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून 24 तासांत सत्य समोर येईलच.

अनिल कपूरचे आगामी चित्रपट
अनिल कपूर कामात सध्या प्रचंड बिझी असून त्यांच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ते आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्यासोबत ‘अल्फा’ (Alpha) या ॲक्शनपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, जो जुलै 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय शाहरुख खानच्या ‘किंग’ (King) या चित्रपटातही ते एका वेगळ्या भूमिकेत झळकतील. सातत्याने चर्चेत राहणारे अनिल कपूर आता या नव्या ‘धमकी’ प्रकरणाने नक्की काय साध्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Paresh Rawal : ‘धुरंधर 2′ खरोखरच कौतुकास्पद.. पण मला आयुष्यात पहिल्यांदा वाटलं..’ दिग्गज अभिनेते परेश रावल यांची प्रांजळ कबुली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number