Raja Dasharatha In Ramayana Movie: ‘रामायण’मध्ये राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अजिंक्य देव होते पहिली पसंती; ऐनवेळी मिळाली या हिंदी अभिनेत्याला संधी

''रामायण'सारख्या महाकाव्याचा भाग असणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे,' असे अजिंक्य देव म्हणाले.

Raja Dasharatha In Ramayana Movie: ‘रामायण’मध्ये राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अजिंक्य देव होते पहिली पसंती; ऐनवेळी मिळाली या हिंदी अभिनेत्याला संधी

Raja Dasharatha In Ramayana Movie: नितेश तिवारी दिग्दर्शित सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या अवाढव्य बजेटमधील 'रामायण' चित्रपटाचा भव्य टीझर समोर आला आहे. या बहुचर्चित चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या, साऊथ सुपरस्टार यश लंकेश रावणाच्या, साई पल्लवी सीता मातेच्या, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहेत. रामानंद सागर यांच्या ऐतिहासिक मालिकेत श्रीरामांची अमर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल या चित्रपटात राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या भूमिकेसाठी सुरुवातीला एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची निवड झाली होती.

राजा दशरथासाठी अजिंक्य देव यांची ऑडिशन अन् 3 वर्षांनंतर झालेला बदल
अरुण गोविल यांच्यापूर्वी लोकप्रिय मराठी अभिनेते अजिंक्य देव हे राजा दशरथाच्या भूमिकेसाठी पहिली पसंती होते. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी या घटनेचा खुलासा केला. साधारण 3 वर्षांपूर्वी त्यांनी या भूमिकेसाठी रीतसर ऑडिशन दिली होती आणि त्यांची निवडही जवळपास पक्की झाली होती. परंतु, जसजसा प्रकल्प पुढे सरकला तसतसे निर्मात्यांनी अरुण गोविल यांना राजा दशरथाच्या भूमिकेसाठी आमंत्रित केले, ज्यामुळे अजिंक्य देव यांच्या भूमिकेत ऐनवेळी बदल करण्यात आला.

अजिंक्य देव आता साकारणार महर्षी विश्वामित्रांची महत्त्वपूर्ण भूमिका
भूमिका बदलल्यानंतर निर्मात्यांनी अजिंक्य देव यांना महर्षी विश्वामित्रांच्या भूमिकेचा प्रस्ताव दिला, जो त्यांनी लगेचच स्वीकारला. यासंदर्भात बोलताना अजिंक्य देव म्हणाले, 'अरुणजी हे राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अत्यंत योग्य आणि योग्य पर्याय आहेत. जेव्हा मला विश्वामित्रांची भूमिका ऑफर झाली, तेव्हा रामायणातील त्या पात्राचे असामान्य महत्त्व ओळखून मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. लुक टेस्टनंतर सर्वांनाच माझा हा नवा अंदाज प्रचंड आवडला.'

हेही वाचा – Kangana Ranaut: 'माझा भूतकाळ काहीही असो, मला विचारसरणी बदलण्याचा अधिकार…'; इंस्टाग्राम व्हिडीओद्वारे टीकाकारांना उत्तर

'माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेशीच भूमिका मिळाली' – अजिंक्य देव
आपल्या भावना व्यक्त करताना अजिंक्य देव पुढे म्हणाले की, ही भूमिका एका अर्थी त्यांच्याकडे आपोआप चालून आली. 'मी दुसऱ्या एका पात्रासाठी ऑडिशन देत होतो, परंतु माझ्या व्यक्तिमत्त्वाला आणि ऊर्जेला विश्वामित्रांचे पात्र अधिक साजेसे ठरले, याचा मला अत्यंत आनंद आहे. 'रामायण'सारख्या महाकाव्याचा भाग असणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे,' असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

अजिंक्य देव यांची यशस्वी कारकीर्द आणि हिंदी-मराठीतील योगदान
अजिंक्य देव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज आणि प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जातात. मराठीतील उल्लेखनीय कामगिरीसोबतच त्यांनी 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' आणि '120 बहादूर' यांसारख्या भव्य हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय 'संसार', 'गैर', 'इंद्रजित' आणि 'पांडव' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही चांगल्याच लक्षात आहेत.

हेही वाचा – Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर 'या' दिग्दर्शकासोबत अडकली होती विवाहबंधनात? या व्यक्तीच्या दाव्याने उडाली खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number