Aishwarya Rai Song: शिक्षण मंडळाचे चाललेय काय? पाचवीच्या पाठ्यपुस्तकात ऐश्वर्या रायचे गाणे छापल्याने मोठा गदारोळ

एवढी मोठी आणि गंभीर चूक मुलांच्या हातात पुस्तक पडेपर्यंत कोणाच्याही लक्षात कशी आली नाही, असा सवाल संतप्त पालकांकडून विचारला जात आहे.

Aishwarya Rai Song: शिक्षण मंडळाचे चाललेय काय? पाचवीच्या पाठ्यपुस्तकात ऐश्वर्या रायचे गाणे छापल्याने मोठा गदारोळ

Aishwarya Rai Song : नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. चक्क इयत्ता 5 वीच्या एका पुस्तकात अभिनेत्री ऐश्वर्या रायचे जगप्रसिद्ध गाणे छापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे नवे पुस्तक शाळांमध्ये पोहोचताच पालकांनी आणि शिक्षण तज्ज्ञांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकदा पुस्तकातील धडे किंवा कवितांमुळे शिक्षण मंडळ चर्चेत येत असते, मात्र गाणे छापण्याच्या या अजब प्रकारामुळे शिक्षण मंडळ आता गोत्यात आले आहे.

हम दिल दे चुके सनम चित्रपटातील गाण्याचा समावेश
हा प्रकार ओडिशामध्ये घडला आहे. ओडिशा टीव्हीच्या एका अहवालानुसार, जेव्हा पाचवीची ही नवीन पुस्तके ऑनलाइन स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली, तेव्हा हा गंभीर प्रकार सर्वप्रथम लोकांच्या समोर आला. यामध्ये 1999 साली प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या हिंदी चित्रपटातील ‘निंबूडा-निंबूडा’ हे गाणे थेट मुलांच्या अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. संपादकीय आणि क्वालिटी नियंत्रण विभागाच्या या अत्यंत निष्काळजी कारभारामुळे शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढी मोठी आणि गंभीर चूक मुलांच्या हातात पुस्तक पडेपर्यंत कोणाच्याही लक्षात कशी आली नाही, असा सवाल संतप्त पालकांकडून विचारला जात आहे.

हेही वाचा – CBSE Three Language Rule: 10 वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; CBSE कडून 'त्रि-भाषा धोरणा'बाबत महत्त्वाची मार्गदर्शक सूचना जारी

शेकडो चुका उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 55 नवीन पुस्तके छापण्यात आली आहेत. मात्र, केवळ हे गाणेच नाही तर या सर्व पुस्तकांमध्ये मिळून तब्बल 1,678 पेक्षा जास्त गंभीर चुका आढळून आल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नवीन पुस्तकांमध्ये झालेल्या गोंधळाची मुख्य कारणे:
– पहिली ते आठवीच्या 55 नवीन पुस्तकांमध्ये तब्बल 1,678 चुका समोर आल्या.
– इयत्ता 5 वीच्या पुस्तकात थेट 1999 मधील बॉलिवूड गाण्याचा समावेश करण्यात आला.
– ऑनलाइन आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर हा सगळा ढिसाळ कारभार उघड झाला.

हेही वाचा – Maharashtra Board: दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत मोठी क्रांती! आता पेपर तपासणार AI, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात होणार मोठे बदल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number