Air Fare Hike: विमान प्रवास महागला, आकासा एअरसह प्रमुख कंपन्यांची भाडेवाढ; प्रवाशांना मोजावा लागणार ‘इंधन अधिभार’

एअर इंडिया आणि इंडिगोपाठोपाठ आता 'आकासा एअर'नेही आपल्या विमान तिकिटांवर 'इंधन अधिभार' (Fuel Surcharge) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Air Fare Hike: विमान प्रवास महागला, आकासा एअरसह प्रमुख कंपन्यांची भाडेवाढ; प्रवाशांना मोजावा लागणार ‘इंधन अधिभार’

Air Fare Hike: जर तुम्ही उद्यापासून म्हणजेच 15 मार्चपासून विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला जास्तीची कात्री बसणार आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जेट इंधनाच्या (ATF) किमती गगनाला भिडल्या आहेत. याचा थेट परिणाम म्हणून एअर इंडिया आणि इंडिगोपाठोपाठ आता 'आकासा एअर'नेही आपल्या विमान तिकिटांवर 'इंधन अधिभार' (Fuel Surcharge) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम 15 मार्च 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून, प्रवाशांना आता प्रवासाच्या अंतरावरून अधिक पैसे मोजावे लागतील.

किती असेल अतिरिक्त बोजा?
आकासा एअरने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासाच्या कालावधीनुसार प्रवाशांना 199 ते 1,300 दरम्यानचा अतिरिक्त अधिभार भरावा लागेल. हा आकार 'प्रति-विमान प्रवास' (Per-flight basis) या तत्त्वावर आकारला जाईल. विमानांच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा वाटा सर्वाधिक असतो; त्यामुळे सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो या कंपन्यांनीही वाढत्या खर्चामुळे यापूर्वीच आपली भाडी वाढवली आहेत.

जेवर विमानतळावर आकासा एअरचे पहिले 'MRO' केंद्र
एकीकडे दरवाढीचे संकट असले, तरी आकासा एअरने देशांतर्गत विमानन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीने नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाशी (जेवर) एक धोरणात्मक करार केला आहे. या अंतर्गत आकासा एअर आपले पहिले 'देखभाल, दुरुस्ती आणि सुधारणा' (MRO) केंद्र जेवर विमानतळाच्या आवारात उभारणार आहे. या सुविधेमुळे विमानांच्या देखभालीसाठी भारताची परदेशांवरील अवलंबित्व कमी होऊन 'आत्मनिर्भरता' वाढणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Instagram Privacy Update: आता इंस्टाग्रामवर चॅट राहणार नाही पूर्णपणे प्रायव्हेट? लवकरच बंद होणार महत्त्वाचं प्रायव्हसी फीचर

जेवर विमानतळाला हिरवा कंदील
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (जेवर) कामाला आता मोठी गती मिळाली आहे. 6 मार्च 2026 रोजी या विमानतळाला 'नागरी विमानन महासंचालनालयाकडून' (DGCA) अधिकृत 'एरोड्रोम परवाना' प्राप्त झाला आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी विमानतळावरून लवकरच व्यावसायिक विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आकासा एअरचे नवीन एमआरओ केंद्र या विमानतळाच्या परिचालन क्षमतेला अधिक बळकट करेल, ज्यामुळे प्रवाशांना भविष्यात अधिक दर्जेदार सेवा मिळणे अपेक्षित आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number