Air India flight Turbulence : आकाशात थरार! एअर इंडियाचं विमान अचानक 300 फूट खाली आलं; नशेत असलेल्या पायलटवर कारवाईची टांगती तलवार

या घटनेनंतर केलेल्या प्राथमिक तपासात आणि चाचणीत विमानाचा मुख्य वैमानिक (पायलट) नशेत असल्याचे समोर आल्याने हवाई वाहतूक क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. <br/>

Air India flight Turbulence : आकाशात थरार! एअर इंडियाचं विमान अचानक 300 फूट खाली आलं; नशेत असलेल्या पायलटवर कारवाईची टांगती तलवार

Air India flight Turbulence :  थायलंडमधील फुकेट शहरातून राष्ट्रीय राजधानी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक मोठी खळबळ उडाली. ओडिशाच्या आकाशात प्रवासात असताना हे विमान अचानक सुमारे 300 फूट खाली घसरले. या अनपेक्षित आणि भीषण धक्क्यामुळे विमानातील 13 प्रवासी तसेच 4 क्रू मेंबर्स जखमी झाले. दिल्ली विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर या सर्व 17 जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर केलेल्या प्राथमिक तपासात आणि चाचणीत विमानाचा मुख्य वैमानिक (पायलट) नशेत असल्याचे समोर आल्याने हवाई वाहतूक क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. 

डीजीसीएकडून सखोल चौकशी सुरू; दोन्ही वैमानिक सेवेतून निलंबित   
या गंभीर घटनेची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. चौकशीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना उड्डाण कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. हे विमान एकूण 145 प्रवाशांना घेऊन उड्डाण करत होते. अचानक झालेल्या या घसरणीमुळे विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये काही बिघाड झाला होता का, किंवा हे संकट केवळ वाईट हवामानामुळे ओढावले होते, याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय, घटनेनंतर विमान थेट दिल्लीपर्यंत नेणे योग्य होते की वाराणसी अथवा लखनौसारख्या जवळच्या विमानतळावर तातडीने उतरवणे गरजेचे होते, या तांत्रिक निर्णयाचीही चौकशी केली जात आहे.  

हेही वाचा –  Dharmendra Pradhan:‘मंत्रीपद माझ्यासाठी…' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्यानंतर मोठा खुलासा, Gen Z आणि NEET आंदोलनावर काय म्हणाले?

एअर इंडियाचे स्पष्टीकरण आणि नियम   
दरम्यान, एअर इंडियाने या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे की, विमानचालन नियमांनुसार कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय व चाचणी प्रक्रिया पार पाडली जाते. प्रवासाच्या अखेरीस वैमानिकांची डोप टेस्ट करण्यात आली असली, तरी त्याचा अंतिम अहवाल अद्याप कंपनीला मिळालेला नाही. त्यामुळे वैमानिकाच्या नशेबाबत अहवाल हाती आल्याशिवाय कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच या तपासात तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही विमान कंपनीने दिले आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number