Pankaj Dheer Death : कर्ण नव्हे; तर या भूमिकेची पंकज धीर यांना ऑफर मिळाली होती; चक्क अशा कारणाने नाकारली अन् बी. आर. चोप्रा भडकले

पंकज धीर यांना सुरुवातीला कर्णाची नव्हे; तर एक अशी वेगळी भूमिका मिळाली होती की, कुणीच नाकारली नसती. मात्र, ती धीर यांनी नाकारली. तीही अशा कारणासाठी की, ते ऐकल्यावर बी. आर. चोप्रा अस्से भडकले की, बस्स!

Pankaj Dheer Death : कर्ण नव्हे; तर या भूमिकेची पंकज धीर यांना ऑफर मिळाली होती; चक्क अशा कारणाने नाकारली अन् बी. आर. चोप्रा भडकले

Pankaj Dheer Death : 'महाभारत' या गाजलेल्या मालिकेत कर्णची (Karna) अविस्मरणीय भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1988 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, या मालिकेत कर्णासाठी नव्हे, तर त्यांची निवड आधी अर्जुनाच्या (Arjuna) भूमिकेसाठी झाली होती. एका मुलाखतीत खुद्द पंकज धीर यांनी याबद्दलचा एक रंजक किस्सा सांगितला होता.

अर्जुनाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती
पंकज धीर यांची महाभारतातील कर्णाची भूमिका गाजली. पण पंकज धीर हे अर्जुनाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती होते. 'लेहरे रेट्रो'ला दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी सांगितले होते, "मी संवादलेखक राही मसूम रझा, भृंग तुपकारी आणि पंडित नरेंद्र शर्माजींसमोर माझं ऑडिशन दिलं होतं आणि त्या सर्वांना मी अर्जुनाच्या भूमिकेसाठी आवडलो होतो आणि आम्ही होकार देत करारावरही स्वाक्षरी केली."

मिशी काढण्यास नकार
पुढे बी. आर. चोप्रा यांनी पंकज यांना बोलावून सांगितले की, "तुला बृहन्नडेचीही (अर्जुनाचंच एक रूप) भूमिका साकारावी लागणार आहे आणि त्यासाठी तुला मिशी काढावी लागेल." यावर पंकज यांनी थेट नकार देत म्हटले होते, "नाही, मी हे करू शकत नाही. मी मिशी कापली तर अजिबात चांगला दिसणार नाही." यावर चोप्रा भयंकर संतापले. पंकज यांच्या उत्तरावर चोप्रांनी थेट सवाल केला, "तू अभिनेता आहेस की कोण? फक्त मिशीसाठी तू एवढ्या मोठ्या भूमिकेवर पाणी सोडतोयस." यानंतर चोप्रा यांनी चि़डून अर्जुनाच्या भूमिकेसाठी केलेला करार फाडला आणि पंकज धीर यांना ऑफिसबाहेर काढलं होतं. नंतर याच मालिकेत पंकज धीर यांना कर्णाची भूमिका मिळाली.
दरम्यान, फक्त मिशीसाठी अर्जुनाच्या भूमिकेला नकार देणे हा आपला मूर्खपणा होता, अशी नंतर कबुली सुद्धा पंकज धीर यांनी दिली.

हेही वाचा – Veteran Actor Pankaj Dheer : कर्करोगाशी झुंज अपयशी; अभिनेता पंकज धीर कालवश

नशिबाने साथ दिली
पंकज धीर यांनी पुढे सांगितलं, 'नंतर जवळपास सहा महिने मी फक्त डबिंग करत फिरत होतो. नंतर चोप्रा यांनी स्वतःहून मला फोन केला आणि विचारले की, मी कर्णाची भूमिका साकारू शकेन का? तेव्हाही मी त्यांना पुन्हा विचारलं, सर, मला मिशी काढावी लागणार नाही ना? त्यांनी नकार देताच मी कर्णाची भूमिका स्वीकारली. पंकज यांनी सांगितले की, ती भूमिका माझ्या नशिबात होती.

हेही वाचा – Hrithik Roshan: हृतिक रोशनची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number