Nita Ambani Banarasi Saree: तब्बल 4 महिन्यांची मेहनत, हिऱ्यांचा साज, शुद्ध रेशमाचा वापर अन्…नीता अंबानींच्या बनारसी साडीची जगभर चर्चा

ही साडी केवळ सुंदरच नाही, तर भारतीय हस्तकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानली जात आहे. या साडीतील नीता अंबानींच्या लूकची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.<br/>

Nita Ambani Banarasi Saree: तब्बल 4 महिन्यांची मेहनत, हिऱ्यांचा साज, शुद्ध रेशमाचा वापर अन्…नीता अंबानींच्या बनारसी साडीची जगभर चर्चा

Nita Ambani Banarasi Saree: रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी त्यांच्या शाही पेहरावामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (NMACC) येथील एका विशेष कार्यक्रमात त्यांनी परिधान केलेल्या बनारसी साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही साडी केवळ सुंदरच नाही, तर भारतीय हस्तकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानली जात आहे. या साडीतील नीता अंबानींच्या लूकची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.

कुशवाह पिता-कन्येने साकारली ‘स्वदेश’ची ही कलाकृती
नीता अंबानी यांनी या कार्यक्रमासाठी ‘स्वदेश’ (Swadesh) ब्रँडची खास हाताने विणलेली बनारसी रेशमी साडी निवडली होती. ही साडी श्री अमरीश कुशवाह आणि त्यांची कन्या अंगिका कुशवाह यांनी अत्यंत मेहनतीने तयार केली आहे. विशेष म्हणजे, या साडीचे विणकाम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 महिन्यांहून अधिक कालावधी लागला. साडीची गुंफण आणि त्यावरील नक्षीकाम भारतीय परंपरेचा वारसा दर्शवते.

मलबेरी सिल्क आणि तीन रंगांची ‘मीनाकारी’
ही साडी इतकी खास असण्यामागे त्यातील साहित्य आणि कारागिरी आहे. ही संपूर्ण साडी शुद्ध ‘मलबेरी सिल्क’पासून बनवण्यात आली असून, त्यावर अस्सल ‘जरी’ आणि तीन रंगांच्या ‘मीनाकारी’ कलेचा वापर करून नाजूक नक्षीकाम करण्यात आले आहे. या साडीवर नीता अंबानी यांनी प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला फिकट निळ्या रंगाचा ‘शँटीली लेस’चा ब्लाउज परिधान केला होता. या ब्लाउजवर केशरी फुलांचे ‘जरदोजी’ काम आणि लहान मोत्यांची सजावट करण्यात आली होती.

हेही वाचा – Girl Reel In IPL: रील बनवणं पडलं 70 हजारांना! मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये एका तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार; पाहा नेमकं काय झालं?

पोल्की हिऱ्यांनी वाढवली साडीची शोभा
आपला राजेशाही लूक पूर्ण करण्यासाठी नीता अंबानी यांनी दागिन्यांची निवडही तितकीच चपखल केली होती. त्यांनी या पेहरावावर ‘पोल्की’ हिऱ्यांचा चोकर सेट आणि त्याला साजेसा बांगड्यांचा संच परिधान केला होता. पारंपरिक शैलीत नेसलेली साडी आणि त्यावर हिऱ्यांच्या दागिन्यांची झळाळी यामुळे नीता अंबानींचा लूक एखाद्या महाराणीसारखा दिसत होता. या कार्यक्रमात त्यांनी ‘NMACC’ आता जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुले असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही केली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number