Veteran Actress Death : ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; ‘हिरो’, ‘कर्ज’ चित्रपटांमध्ये साकारल्या उल्लेखनीय भूमिका

'कर्ज', 'हिरो' आणि 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील त्यांच्या कामामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून होत्या.<br/>

Veteran Actress Death : ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; ‘हिरो’, ‘कर्ज’ चित्रपटांमध्ये साकारल्या उल्लेखनीय भूमिका

Veteran Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. शुक्रवारी, 13 मार्च रोजी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, एका कर्तृत्ववान अभिनेत्रीला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 'कर्ज', 'हिरो' आणि 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील त्यांच्या कामामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून होत्या.

सुभाष घई यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
मधु मल्होत्रा यांच्या निधनावर ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी खोल दुःख व्यक्त केले आहे. मधु यांचे वर्णन करताना घई म्हणाले की, "त्या एक अत्यंत विनम्र स्त्री होत्या. 'हिरो' चित्रपटातील अजरामर ठरलेल्या 'लंबी जुदाई' या गाण्यासाठी मला अशा अभिनेत्रीची गरज होती जिचे डोळे बोलके असतील आणि मधु यांनी ती भूमिका सार्थ ठरवली." पाकिस्तानी गायिका रेश्मा यांनी गायलेले हे लोकगीत मधु मल्होत्रा यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे आजही लोकांच्या स्मरणात आहे.

चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय प्रवास
मधु मल्होत्रा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. 'रिश्ता कागज का', 'विश्वनाथ', 'कयामत' आणि 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. आपल्या बोलक्या डोळ्यांनी आणि नैसर्गिक अभिनयाने त्यांनी 1980 च्या दशकातील चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आज त्या शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसल्या, तरी त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.

हेही वाचा – Sanjay Dutt : संजय दत्तचा जबरा फॅन! चाहत्याकडून 'गोल्ड-प्लेटेड' iPhone 17 भेट; सुनील दत्त – नर्सिग यांच्याशी जुळलं कनेक्शन

अंत्यसंस्काराची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, मधु मल्होत्रा यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 4:00 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार असून, ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यापूर्वी, दुपारी 12:00 ते 3:00 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे, जिथे चित्रपटसृष्टीतील त्यांचे सहकारी आणि चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number