PM Modi Norway Visit: भारत-नॉर्वे मैत्रीचे नवे पर्व; पंतप्रधान मोदींना प्रतिष्ठेचा ‘रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कार प्रदान

नॉर्वेचे राजे हॅराल्ड पंचम यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना 'ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट' हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला

PM Modi Norway Visit: भारत-नॉर्वे मैत्रीचे नवे पर्व; पंतप्रधान मोदींना प्रतिष्ठेचा ‘रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कार प्रदान

PM Modi Norway Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यात त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोमवारी नॉर्वेचे राजे हॅराल्ड पंचम यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. नॉर्वे आणि आंतरराष्ट्रीय समुदायासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट सेवा आणि जागतिक योगदानाच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो. या सन्मानासह पंतप्रधान मोदींना त्यांच्या कार्यकाळात परदेशी राष्ट्रांकडून मिळालेल्या एकूण आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची संख्या आता 32 झाली आहे.

हेही वाचा – First look of India’s Bullet Train: समुद्राखालून प्रवास, ताशी 320 किमी वेग… भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या छायाचित्रांनी वेधले सर्वांचे लक्ष

काय आहे ‘रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’?

या ऐतिहासिक पुरस्काराची स्थापना 1985 मध्ये राजे ओलाव पंचम यांनी केली होती. नॉर्वे आणि मानवतेच्या हितासाठी अपवादात्मक सेवा देणाऱ्या परदेशी नागरिकांना हा बहुमान दिला जातो. या पुरस्काराच्या चिन्हात सोने आणि चांदीने मढवलेला ‘सेंट ओलाव क्रॉस’ असून त्यावर राजे ओलाव पंचम यांचे आद्याक्षर आहे. नियमानुसार, ‘ग्रँड क्रॉस’ हा उजव्या खांद्यापासून डाव्या बाजूला जाणाऱ्या रुंद कमरपट्ट्यासह परिधान केला जातो. हा सन्मान मिळवणे हे भारत आणि नॉर्वे यांच्यातील वाढत्या मैत्रीचे प्रतीक मानले जात आहे.

पाच देशांचा दौरा आणि भारत-नॉर्डिक शिखर परिषद
पंतप्रधान मोदी सध्या 15 ते 20 मे दरम्यान पाच देशांच्या दौऱ्यावर असून, नॉर्वे हा त्यांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा आहे. ओस्लोला पोहोचण्यापूर्वी त्यांनी संयुक्त अरब अमिरात (UAE), नेदरलँड्स आणि स्वीडनला भेट दिली. विशेष म्हणजे, स्वीडनमध्येही त्यांना ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. नॉर्वेमध्ये पंतप्रधान तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते इटलीला भेट देऊन आपला दौरा पूर्ण करतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number