Rare Childbirth: निसर्गाचा चमत्कार की वैद्यकीय गूढ? महिलेने 5 दिवसांच्या अंतराने दिला 4 मुलांना जन्म; डॉक्टरही झाले थक्क!

या प्रकरणाने वैद्यकीय तज्ज्ञांनाही बुचकळ्यात पाडले असून, सर्वसामान्यांकडून याला 'निसर्गाचा चमत्कार' मानले जात आहे.<br/>

Rare Childbirth: निसर्गाचा चमत्कार की वैद्यकीय गूढ? महिलेने 5 दिवसांच्या अंतराने दिला 4 मुलांना जन्म; डॉक्टरही झाले थक्क!

Rare Childbirth: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून विज्ञानाला आणि मानवी कल्पनेलाही आव्हान देणारी एक अत्यंत आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने अवघ्या पाच दिवसांच्या अंतराने चार गोंडस मुलांना जन्म दिला असून, ही घटना सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. या प्रकरणाने वैद्यकीय तज्ज्ञांनाही बुचकळ्यात पाडले असून, सर्वसामान्यांकडून याला 'निसर्गाचा चमत्कार' मानले जात आहे.

पाच दिवसांचे विलक्षण अंतर
मोरादाबाद येथील 'TMU रुग्णालयात' ही दुर्मिळ प्रसूती पार पडली. अमीना नावाच्या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने 9 मे रोजी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. मात्र, खरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यानंतर इतर तीन मुलांचा जन्म तब्बल पाच दिवसांनी, म्हणजेच 14 मे रोजी झाला. पहिल्या आणि दुसऱ्या प्रसूतीमधील हे पाच दिवसांचे अंतर वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचे मानले जात आहे.

दोन मुले आणि दोन मुलींचे आगमन
या महिलेने दोन मुले आणि दोन मुलींना जन्म दिला आहे. एकाच वेळी चार बाळांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे उधाण आले आहे. गावातही या घटनेचे कुतूहल पसरले असून, ही बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जुळे किंवा तिळे मुले होण्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात, परंतु नैसर्गिकरित्या पाच दिवसांच्या अंतराने चार मुलांचा जन्म होणे ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

हेही वाचा – Palghar News : फळभाज्यांचा ट्रक उलटला तरी लोकं फळं चोरून नेतात; चारोटी पुलावर तर 600 किलो चांदी वाहतूक करणारी व्हॅन उलटली, पुढे काय झालं?…

वैद्यकीय क्षेत्रातील मोठे गूढ
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एकाच गर्भधारणेत चार मुले असणे (Quadruplets) ही बाब सहसा आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानामुळे घडते. मात्र, नैसर्गिक प्रसूतीमध्ये अशा प्रकारे दिवसांच्या अंतराने बाळांचा जन्म होणे हे एक मोठे 'वैद्यकीय गूढ' आहे. या घटनेने वैद्यकीय शास्त्रासमोर नवीन अभ्यासाचा विषय ठेवला आहे. सध्या आई आणि चारही मुले सुरक्षित असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number