Bank Job Recruitment 2026: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS द्वारे 11 बँकांमध्ये 11,403 लिपिक पदांची मेगाभरती

IBPS ने देशातील 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मिळून 11,403 'कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स' (CSA/लिपिक) पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

Bank Job Recruitment 2026: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS द्वारे 11 बँकांमध्ये 11,403 लिपिक पदांची मेगाभरती

IBPS Clerk Recruitment 2026: बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन' (IBPS) ने देशातील 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मिळून 11,403 'कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स' (CSA/लिपिक) पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीची प्राथमिक ऑनलाइन परीक्षा ऑक्टोबर 2026 मध्ये आयोजित केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक

या भरती प्रक्रियेसाठीची संक्षिप्त माहिती 27 जुलै 2026 रोजी देण्यात आली होती, तर विस्तृत अधिसूचना 1 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू: 1 ऑगस्ट 2026 (मध्यरात्री 12:01 वाजता)
अर्जाची अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
प्राथमिक परीक्षा (Prelims): 10 आणि 11 ऑक्टोबर 2026
मुख्य परीक्षा (Mains): 27 डिसेंबर 2026
 
वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष

वय 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे तर कमाल 28 वर्षांपर्यंत असावे.  

शिक्षण: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

भाषा व संगणक ज्ञान: संबंधित राज्याची स्थानिक भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येणे अनिवार्य आहे. तसेच संगणकाचे ज्ञान (प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा शालेय/महाविद्यालयीन स्तरावर संगणक विषय) असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांतील रिक्त जागांचे प्रमाण
देशभरात एकूण 11,403 जागांसाठी ही भरती होत असून, यामध्ये महाराष्ट्रात 1,051 जागा उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशात सर्वाधिक 1,731, कर्नाटकात 1,414, पश्चिम बंगालमध्ये 946 आणि गुजरातमध्ये 698 जागांचा समावेश आहे.

हेही वाचा – Automobile Industry Layoffs: ऑटोमोबाईल क्षेत्रात खळबळ; 'या' दिग्गज कंपनीत मोठी नोकरकपात, 2027 पर्यंत 8000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

अर्ज शुल्क आणि वेतनश्रेणी 

परीक्षा शुल्क: सर्वसाधारण (General), OBC आणि EWS वर्गातील उमेदवारांसाठी 850 शुल्क निश्चित केले आहे, तर SC, ST, PwBD आणि माजी सैनिकांसाठी 175 शुल्क राहील.

वेतन: निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा 24,050 ते 64,480 या वेतनश्रेणीत वेतन मिळेल. यासोबतच महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) व इतर सरकारी नियमांनुसार भत्ते दिले जातील. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number