Bharat Taxi Launch: ओला-उबरला टक्कर? ‘या’ राज्यात धावणार देशातील पहिली सहकार तत्त्वावर आधारित भारत टॅक्सी

अमित शाह शनिवारी गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमधून 'भारत टॅक्सी' या देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवेचा औपचारिक शुभारंभ करतील.

Bharat Taxi Launch: ओला-उबरला टक्कर? ‘या’ राज्यात धावणार देशातील पहिली सहकार तत्त्वावर आधारित भारत टॅक्सी

 Bharat Taxi Launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकार से समृद्धी' या संकल्पनेला मूर्त रूप देत, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह शनिवारी गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमधून 'भारत टॅक्सी' या देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवेचा औपचारिक शुभारंभ करतील. यापूर्वी डिसेंबर 2025 मध्ये गुजरातमध्ये या सेवेचे प्राथमिक टप्प्यातील (सॉफ्ट लाँच) यशस्वी सादरीकरण झाले होते. आता वाहतूक आणि गतिशीलता क्षेत्रात चालकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरत आहे.

गुजरातमध्ये 1.5 लाखांहून अधिक चालक 'भारत टॅक्सी'शी जोडले गेले
सहकारी चळवळीत नेहमीच अग्रेसर राहिलेल्या गुजरातने 'भारत टॅक्सी'च्या विस्तारामध्ये अवघ्या काही महिन्यांतच उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. सध्या देशभरातील एकूण 7 लाख चालकांपैकी ('सारथी') एकट्या गुजरात राज्यातील 1.5 लाखांहून अधिक चालक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. तसेच, संपूर्ण भारतातील 37 लाखांहून अधिक ग्राहकांनी आतापर्यंत 'भारत टॅक्सी'च्या डिजिटल सेवांचा लाभ घेतला आहे.

राज्यातील 'या' 14 प्रमुख शहरांमध्ये सेवा होणार सुरू
हा भव्य शुभारंभ गुजरातच्या 14 प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी केला जात आहे. यामध्ये अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट आणि जामनगर, द्वारका, सोमनाथ, वलसाड, आणंद आणि भावनगर, नडियाद, जुनागड, मेहसाणा आणि अमरेली या शहरांचा समावेश आहे. येत्या अवघ्या 1 महिन्यात संपूर्ण गुजरात राज्यात ही सेवा विस्तारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्घाटनाच्या विशेष कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहराज्यमंत्री हर्ष संघवी आणि 'भारत टॅक्सी'शी जोडलेले 4,000 हून अधिक चालक प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

पारंपरिक टॅक्सी कंपन्यांच्या तुलनेत 'भारत टॅक्सी'चे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण प्लॅटफॉर्म 'झिरो-कमिशन' (शून्य कमिशन) मॉडेलवर चालते. यामुळे प्रवासातून मिळणाऱ्या कमाईचा जास्तीत जास्त हिस्सा थेट चालकांपर्यंत पोहोचतो. याशिवाय, चालकांना विमा, सुलभ कर्ज, पेन्शन आणि विविध सरकारी समाजकल्याण योजनांचे कवच दिले जात असल्याने 'चालक-ते-मालक' (Driver-as-Owner) ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे.

हेही वाचा – MPSC परीक्षांमध्ये मोठा बदल; 2027 पासून CBT प्रणाली होणार लागू

ग्राहकांसाठी परवडणारा दर आणि सुरक्षित प्रवासाची हमी
चालकांसोबतच ग्राहकांच्या हिताचाही यात विचार करण्यात आला आहे. 'भारत टॅक्सी'मध्ये मागणी वाढली तरी भाडे न वाढवणारे 'सर्ज-फ्री' दर धोरण लागू असेल. प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार बाईक, ऑटो आणि कॅब निवडण्याचा पर्याय मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गुजरात पोलिसांच्या पाठींब्यामुळे हा प्रवास पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह असेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number