College Students HIV Reports: महाविद्यालयांमधील 7,000 तरुण विद्यार्थ्यांना HIV चा संसर्ग; धक्कादायक अहवालाने वाढवली चिंता

राज्यातील तब्बल 7,000 तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे राज्य प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.<br/>

College Students HIV Reports: महाविद्यालयांमधील 7,000 तरुण विद्यार्थ्यांना HIV चा संसर्ग; धक्कादायक अहवालाने वाढवली चिंता

HIV College Students Report: भारतात HIV बाबत सातत्याने जनजागृती मोहीम राबवली जात असली तरी या आजाराचा प्रसार पूर्णपणे रोखणे अजूनही एक मोठे आव्हान ठरत आहे. प्रतिबंध हाच या आजारावरील एकमेव उपाय मानला जातो. अशातच कर्नाटकातून एक अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली असून, राज्यातील तब्बल 7,000 तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे राज्य प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

18 ते 25 वयोगटातील तरुणांना संसर्ग; उच्च शिक्षण संस्थांमध्ये विशेष मोहीम
कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेने (KSAPS) दिलेल्या अहवालानुसार, बाधित आढळलेले विद्यार्थी हे 18 ते 25 या वयोगटातील आहेत. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्नाटक सरकारने राज्यभरात विशेष आरोग्य मोहीम आखली आहे. याअंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना एचआयव्ही चाचणी आणि वैद्यकीय समुपदेशन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. 'द हिंदू'च्या वृत्तानुसार, यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

राज्यातील वाढती आकडेवारी आणि उपचारांचे आव्हान
कर्नाटकच्या एकूण 6.11 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 2.60 लाख व्यक्ती एचआयव्हीने ग्रस्त आहेत. यातील सुमारे 1.05 लाख बाधितांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत, तर दुर्दैवाने 54,000 लोकांना स्वतःला संसर्ग झाल्याची साधी कल्पनाही नाही. राज्यातील 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये संसर्गाचा आलेख झपाट्याने उंचावत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – Anti Paper Leak Bill: पेपर फोडणाऱ्यांचे आता खैर नाही; लोकसभेत विरोधकांच्या गदारोळात 'अँटी-पेपर लीक' विधेयक संमत

तीन वर्षांत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
राज्यातील एकूण एचआयव्ही बाधितांची आकडेवारी पाहता, वर्ष 2023-24 मध्ये ही संख्या 44,500 इतकी नोंदवली गेली होती. मात्र, 2025-26 च्या आकडेवारीनुसार हा आकडा वाढून थेट 66,600 वर पोहोचला आहे. यामध्ये 7,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असणे हा सर्वात चिंतेचा विषय ठरला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर शैक्षणिक आणि आरोग्य वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number