LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! ‘या’ गॅस सिलिंडरवर परत मिळणार 500 रुपये; जाणून घ्या काय आहे ही खास योजना

या सिलिंडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही अधिकृत गॅस कनेक्शनची किंवा खूप जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते.

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! ‘या’ गॅस सिलिंडरवर परत मिळणार 500 रुपये; जाणून घ्या काय आहे ही खास योजना

5kg LPG Gas Cylinder Buyback Offer 500 Rupees: स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नुकतीच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर बाजारात सर्व प्रकारच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असताना, सामान्य नागरिक घरगुती वापरासाठी 14.2 kg च्या एलपीजी सिलिंडरची खरेदी करतात. मात्र, देशात असाही एक मोठा ग्राहकवर्ग आहे ज्यांना मोठ्या सिलिंडरऐवजी 5 kg चा लहान सिलिंडर वापरणे सोयीचे वाटते. विशेषतः भाड्याच्या घरात राहणारे नागरिक किंवा विद्यार्थी ज्यांच्याकडे कायमस्वरूपी पत्ता किंवा अधिकृत गॅस कनेक्शन नाही, अशा लोकांसाठी हा लहान सिलिंडर उत्तम पर्याय ठरत आहे.

इंडियन ऑइलचा 'छोटू' गॅस सिलिंडर
ग्राहकांची हीच अडचण दूर करण्यासाठी इंडियन ऑइलने 5 kg क्षमतेचा एलपीजी गॅस सिलिंडर बाजारात उपलब्ध करून दिला आहे, जो 'छोटू' या नावाने ओळखला जातो. या सिलिंडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही अधिकृत गॅस कनेक्शनची किंवा कागदपत्रांची आवश्यकता नसते. हे सिलिंडर सहजतेने उपलब्ध होत असल्याने ग्राहक आपल्या सोयीनुसार कोणत्याही शहरात याचा वापर करू शकतात.

हेही वाचा – Jammu And Kashmir : लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या संघटनेचा अनंतनागमध्ये भ्याड हल्ला; पोलिसांवर बेछुट गोळीबार, एका पोलिसाचा मृत्यू

500 रुपये परताव्याची (Buyback) आकर्षक ऑफर
या योजनेत ग्राहकांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशांचा परतावा होय. जर एखाद्या ग्राहकाला भविष्यात या 5 kg च्या 'छोटू' एलपीजी सिलिंडरची गरज उरली नाही, तर तो हा सिलिंडर अधिकृत विक्री केंद्रावर जाऊन जमा करू शकतो. सिलिंडर परत केल्यावर ग्राहकाला प्रत्येक सिलिंडरमागे 500 रुपये परत मिळतात. ही 500 रुपयांची निश्चित बायबॅक रक्कम ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरते.

खरेदी प्रक्रिया आणि वापर अत्यंत सोपा
हा गॅस सिलिंडर खरेदी करण्याची पद्धत खूप सोपी ठेवण्यात आली आहे. नागरिक केवळ आपले अधिकृत ओळखपत्र दाखवून कोणत्याही विक्री केंद्रावरून हा 5 kg चा सिलिंडर विकत घेऊ शकतात. त्यानंतर एखाद्या ग्राहकाची दुसऱ्या शहरात बदली झाली, तरी तो जुना सिलिंडर जमा करून 500 रुपये परत घेऊ शकतो आणि नवीन शहरात जाऊन पुन्हा अशाच पद्धतीने नवा सिलिंडर खरेदी करू शकतो.

हेही वाचा – Assam Flood : आसाममध्ये महापूर! गेल्या 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, 3.6 लाख लोक बेघर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number