मोठी बातमी! भारतातील 24 विमानतळ 15 मे पर्यंत बंद

अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या असून त्यांना विमानतळ बंद आणि सुरक्षा प्रोटोकॉलबद्दल माहिती देण्यात आली आहे.

मोठी बातमी! भारतातील 24 विमानतळ 15 मे पर्यंत बंद
Edited Image

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने देशातील 24 विमानतळ 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी यासाठी 10 मे पर्यंत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु, आता ही तारीख वाढविण्यात आली आहे. अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या असून त्यांना विमानतळ बंद आणि सुरक्षा प्रोटोकॉलबद्दल माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, सर्व विमान कंपन्यांनी सांगितले होते की केंद्राच्या सूचनेनुसार, प्रवाशांना विमान सुटण्याच्या तीन तास आधी विमानतळावर पोहोचावे लागेल. फ्लाइट सुटण्याच्या 75 मिनिटे आधी चेक-इन बंद होईल.

हेही वाचा – 'आमचा पंतप्रधान डरपोक आहे' पाकिस्तानचे खासदार शाहिद अहमद खटक यांची शरीफ यांना चपराक

15 मे पर्यंत 'हे' विमानतळ बंद राहतील – 

इंडिगोने श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धरमशाला, बिकानेर, जोधपूर, किशनगढ आणि राजकोट येथून 10 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तथापि, चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पटियाला, शिमला, जैसलमेर, बिकानेर, बिकानेर, जैसलमेर, बिकानेर, लेह, जैसलमेर, पठाणकोट आणि इतर शहरातील विमानतळ 15 मे पर्यंत बंद राहतील. 

हेही वाचा – पाकड्यांनी 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; कर्नल सोफिया कुरेशी यांचा खुलासा

दिल्ली विमानतळावरून 100 हून अधिक उड्डाणे रद्द – 

दरम्यान, आज दिल्ली विमानतळावरून 100 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, कडक सुरक्षा उपायांमुळे विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी 5 ते दुपारी 2 या वेळेत, निघणारे एकूण 66 देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आणि इतर ठिकाणाहून येणारी 63 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली. या काळात, परदेशात जाणारे 5 आणि परदेशातून भारतात येणारे 4 विमान उड्डाणे देखील रद्द करण्यात आली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number