Vietnam Boat Accident: व्हिएतनामधील बोट अपघातात 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून तीव्र दुःख व्यक्त

पर्यटकांनी भरलेली एक स्पीडबोट समुद्रात उलटल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Vietnam Boat Accident: व्हिएतनामधील बोट अपघातात 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून तीव्र दुःख व्यक्त

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘फू क्वोक’ (Phu Quoc) बेटाजवळ शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली एक स्पीडबोट समुद्रात उलटल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. व्हिएतनामी वृत्तसंस्था ‘व्हीएनएक्सप्रेस इंटरनॅशनल’ ने दिलेल्या माहितीनुसार, या बोटीमध्ये 32 भारतीय पर्यटकांसह 4 कर्मचारी स्वार होते. ‘हॉन मे रुट’ येथून ‘आन थोई’ बंदराच्या दिशेने जात असताना ‘हॉन मे रुट न्गोई’ पासून अवघ्या 400 मीटर अंतरावर ही बोट उलटली आणि सर्व प्रवासी समुद्रात फेकले गेले. या अत्यंत दुर्दैवी घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतीय दूतावासाकडून युद्धपातळीवर बचावकार्य; मदत व माहितीसाठी नियंत्रण कक्ष सुरू

अपघाताची माहिती मिळताच हनोई येथील भारतीय दूतावास आणि हो ची मिन्ह सिटी येथील वाणिज्य दूतावासाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली आहे. या आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना तात्काळ माहिती पुरवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष (Control Rooms) स्थापन करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, “व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेच्या वृत्ताने मला प्रचंड वेदना झाल्या आहेत. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती मी सहसंवेदना व्यक्त करतो. आमचे अधिकारी व्हिएतनाम सरकारशी सतत संपर्कात असून जखमींच्या उपचारासाठी आणि मदतीसाठी सर्व पावले उचलली जात आहेत.”

बेपत्ता पर्यटकांच्या कुटुंबांना तातडीने मदत देण्याची काँग्रेसची परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी

या दुर्घटनेनंतर काँग्रेस पक्षानेही केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे तत्परतेने पावले उचलण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे माध्यम व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी सांगितले की, व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने या बोटीत प्रवास करणाऱ्या सर्व 32 भारतीय पर्यटकांची नावे जाहीर केली आहेत. 

हेही वाचा – Vietnam Indian Tourist Boat Accident : मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; 15 पर्यटकांचा मृत्यू, तर 32 हून अधिक जणांचा जीव धोक्यात

अद्याप अनेक पर्यटकांचा शोध लागणे बाकी असून, त्यांच्या काळजीत असलेल्या कुटुंबांना परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ संपर्क साधून सर्व संभाव्य मदत आणि माहिती पुरवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. संपूर्ण देश या कठीण प्रसंगी बेपत्ता पर्यटकांच्या पाठीशी उभा असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number