‘सत्यजीतच्या आरोपांची चर्चा तर होणारच’

नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर […]

‘सत्यजीतच्या आरोपांची चर्चा तर होणारच’

नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला. काँग्रेसचे नाव न वापरताही सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्याने अपक्ष म्हणून विजयी झाले. यावेळी त्यांना स्थानिक भाजपचा पाठिंबा होता असं जाहीर करण्यात आलं होतं.

कॉंग्रेसने सुधीर तांबे यांच्यासह सत्यजीत तांबे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागेलेलं आहे. सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.

“सत्यजित तांबेंच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह घेऊन लढले नाही. सत्यजित आमचे आहेत आणि आमच्या बरोबर राहतील”, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

तर पुढे ते म्हणाले, “पक्षावर राग नसेल तर त्यांनी पक्षासोबत राहावं. पण पक्षातील पद आणि व्यक्ती बदलत राहातात. त्यांची वैयक्तिक कुणावर नाराजी असेल तर पक्षाला सोडून जाऊ नये.तसेच झालं गेलं महाभारत विसरून सत्यजित तांबेंना सोबत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः हाय कमांडला तशी विनंती करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.”, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number