Chardham Yatra 2026 Registration: चार धाम यात्रेसाठी 10 लाख भाविकांची नोंदणी; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल रजिस्ट्रेशन

यंदाच्या चार धाम यात्रेचे वेळापत्रक निश्चित झाले असून, 19 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडल्यानंतर यात्रेला अधिकृत सुरुवात होईल.

Chardham Yatra 2026 Registration: चार धाम यात्रेसाठी 10 लाख भाविकांची नोंदणी; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल रजिस्ट्रेशन

Chardham Yatra 2026 Registration: उत्तराखंडमधील पवित्र चार धाम यात्रेसाठी भाविकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत असून, 2026 च्या यात्रेसाठी आतापर्यंत 10 लाखांहून अधिक भाविकांनी यशस्वीरीत्या नोंदणी पूर्ण केली आहे. 6 मार्चपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अवघ्या काही दिवसांतच भाविकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. यंदाची ही बहुप्रतिक्षित तीर्थयात्रा 19 एप्रिल 2026 रोजी 'अक्षय्य तृतीये'च्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

नोंदणीची प्रक्रिया आणि अधिकृत संकेतस्थळ
भाविकांना आपली नोंदणी अधिकृत संकेतस्थळ registrationandtouristcare.uk.gov.in किंवा 'Tourist Care Uttarakhand' या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे करता येईल. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्पष्ट केले आहे की, नोंदणीसाठी सध्या कोणतीही अंतिम मुदत जाहीर करण्यात आलेली नाही. भाविक केदारनाथ आणि बद्रिनाथ मंदिरांचे दरवाजे उघडण्यापूर्वी किंवा यात्रेदरम्यानही नोंदणी करू शकतात. मात्र, यात्रेच्या काळात होणारी संभाव्य गर्दी आणि उपलब्ध 'स्लॉट्स' लक्षात घेता, भाविकांनी आपली नोंदणी शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मंदिरांचे दरवाजे उघडण्याचे वेळापत्रक
यंदाच्या चार धाम यात्रेचे वेळापत्रक निश्चित झाले असून, 19 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडल्यानंतर यात्रेला अधिकृत सुरुवात होईल. त्यानंतर 22 एप्रिल रोजी केदारनाथ धामचे आणि 23 एप्रिल रोजी बद्रिनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाणार आहेत. यावर्षी भाविकांच्या संख्येवर कोणतेही विशेष बंधन किंवा मर्यादा घालण्यात आलेली नाही, ज्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

हेही वाचा – Ram Navami 2026 : रामनवमीला 'नवपंचम' राजयोगाचा शुभ संयोग! 'या' राशींना मिळणार पदोन्नती आणि व्यवसायात नफा

सुरक्षा आणि अद्ययावत हवामान अंदाज
नैसर्गिक आपत्ती आणि डोंगराळ भागातील हवामानाचा अंदाज घेऊन यावर्षी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की, यात्रेदरम्यान भाविकांना हवामानाचे अद्ययावत अंदाज आणि संभाव्य धोक्यांची माहिती वेळोवेळी पुरवली जाईल. यात्रेच्या मार्गावरील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः दौऱ्यावर जाणार असून, रस्ते आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number