Weight Loss Surgery: प्रेयसीच्या कुटुंबासाठी वजन कमी करायला गेला अन् भलतचं घडलं; शस्त्रक्रियेदरम्यान झाला 36 वर्षीय प्रियकराचा मृत्यू

हेनान प्रांतातील ली झियांग (36) हे लठ्ठपणामुळे त्रस्त होते. 134 किलोपेक्षा जास्त वजन, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि मेटाबॉलिक सिंड्रोम अशी त्यांची आरोग्यस्थिती होती.

Weight Loss Surgery: प्रेयसीच्या कुटुंबासाठी वजन कमी करायला गेला अन् भलतचं घडलं; शस्त्रक्रियेदरम्यान झाला 36 वर्षीय प्रियकराचा मृत्यू

Weight Loss Surgery: चीनमध्ये अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या कुटुंबावर चांगला प्रभाव पडावा यासाठी वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या 36 वर्षीय तरुणाचा काही दिवसांतच मृत्यू झाला. ही घटना सोशल मीडियावर समोर येताच जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, हेनान प्रांतातील ली झियांग (36) हे लठ्ठपणामुळे त्रस्त होते. 134 किलोपेक्षा जास्त वजन, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि मेटाबॉलिक सिंड्रोम अशी त्यांची आरोग्यस्थिती होती. नुकतेच ते एका नात्यात अडकले आले होते आणि लवकरच प्रेयसीच्या पालकांना भेटणार होते. त्यामुळे स्वतःला अधिक निरोगी आणि आकर्षक दाखवण्यासाठी त्यांनी वजन कमी करण्यासाठी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Moga GST Notice: रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या मजूराला आयकर विभागाने पाठवली 35 कोटींची कर नोटीस; नेमकं काय घडलं?

शस्त्रक्रिया यशस्वी पण…   

दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी ली यांना झेंगझोऊ येथील नवव्या पीपल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 2 ऑक्टोबर रोजी त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. सुरुवातीस त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र 4 ऑक्टोबर रोजी ली यांची प्रकृती अचानक खालावू लागली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, पण तब्येत सतत बिघडतच गेली. पुढील दिवशी, म्हणजे 5 ऑक्टोबरला, त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि श्वसनक्रिया बंद पडल्याने त्यांचे निधन झाले.

हेही वाचा – Most Expensive Potato : बापरे!! 1 किलो बटाट्याची किंमत 1 लाख रुपये; खरेदीसाठी लोक लावतात चक्क रांगा

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

ही घटना समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी दु:ख आणि संताप व्यक्त केला. एका वापरकर्त्याने लिहिले, “जर प्रेम खरे असेल, तर व्यक्तीला जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे.” दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, “मृत्यू कधी येईल सांगता येत नाही.” या घटनेने फक्त चीनमध्ये नव्हे तर जगभरात वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची सुरक्षितता, आरोग्य जोखीम आणि सामाजिक दबाव या विषयांवर मोठी चर्चा पुन्हा रंगली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number