Maharashtra TET Scam: TET घोटाळ्याचे धागेदोरे थेट बिहार-हरियाणात; आणखी 3 आरोपींना बेड्या

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी 3 आरोपींना अटक केली आहे.

Maharashtra TET Scam: TET घोटाळ्याचे धागेदोरे थेट बिहार-हरियाणात; आणखी 3 आरोपींना बेड्या

Maharashtra TET Scam: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कपिल दहिया, सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांचा समावेश आहे. या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रियेची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून 'टीईटी' परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या तांत्रिक आणि प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच एका विशेष समितीची स्थापना करणार आहे, जी ऑफलाइन स्वरूपाचे ऑनलाइन पद्धतीत सुरक्षित रूपांतर करेल.

28 जूनची परीक्षा झाली होती रद्द; तपासासाठी मुख्यमंत्र्यांकडून SIT ची स्थापना
टीईटी परीक्षेच्या कथित पेपरफुटीमुळे प्रशासनाला मोठा धक्का बसला होता, ज्याच्या परिणामी 28 जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पावले उचलत, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आणि दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिले आहेत.

बिहार आणि हरियाणा कनेक्शन उघड; पोलिसांकडून मूळ प्रश्नपत्रिकांसह मुद्देमाल जप्त
भिवंडी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे या घोटाळ्याचे धागेदोरे बिहार आणि हरियाणापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेपूर्वी कोंगाओव परिसरात काही व्यक्ती फुटलेल्या प्रश्नपत्रिकांची विक्री करण्याचा कट आखत असल्याची खात्रीशीर माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल फोन, डेबिट-क्रेडिट कार्ड्स, रोख रक्कम आणि थेट टीईटी प्रश्नपत्रिकेच्या 4 मूळ प्रती जप्त करण्यात आल्या. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर जप्त केलेले पेपर हे दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या मूळ परीक्षेचेच असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Pune Crime News : विरोधी पक्षनेत्यावर चाकू-चॉपरनं वार, नगरपरिषदेसमोरचं जीवघेणा हल्ला; नगरसेवकासह एक जण गंभीर जखमी

रॅकेटच्या मुळाशी पोहोचण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट; कठोर कारवाईचा इशारा
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेली एसआयटी (SIT) या पेपरफुटीमागे सक्रिय असलेल्या संपूर्ण आंतरराज्‍यीय नेटवर्कचा पर्दाफाश करणार आहे. या घोटाळ्यात आणि शासकीय व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कृत्यात सामील असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number