Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात पाण्याचे भीषण संकट; उजनी धरण उणे 24.37 टक्क्यांवर, 44 लघु तलाव पूर्णपणे कोरडे!

मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे आणि उन्हाळ्यातील पाण्याच्या उपशामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी परिस्थिती अतिशय बिकट आहे.

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात पाण्याचे भीषण संकट; उजनी धरण उणे 24.37 टक्क्यांवर, 44 लघु तलाव पूर्णपणे कोरडे!

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला असून, सध्या तो उणे 24.37 टक्के इतक्या चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे आणि उन्हाळ्यातील पाण्याच्या उपशामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी परिस्थिती अतिशय बिकट आहे, कारण गेल्या वर्षी 18 जून रोजी उजनी धरणात तब्बल 54.75 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या जिल्ह्यातील नागरिक आणि बळीराजा केवळ मागील हंगामातील शिल्लक साठ्यावरच अवलंबून आहेत.

मध्यम प्रकल्पांची स्थिती आणि सीना नदीवरील बंधारे कोरडे
जिल्ह्यातील मध्यम सिंचन प्रकल्पांची स्थितीही फारशी समाधानकारक नसून, सात मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ 33.33 टक्के म्हणजेच 2.41 TMC उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी जूनच्या उत्तरार्धात हाच साठा 5.42 TMC (75 टक्के) इतका मजबूत होता. विशेषतः पिंपळगाव ढाळे हा प्रकल्प उणे 8.52 टक्क्यांवर गेला आहे. दुसरीकडे, सीना नदीवरील 24 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांपैकी तब्बल 20 बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. कव्हे, कोळेगाव, शिरापूर आणि अर्जुनसोंड या अवघ्या 4 बंधाऱ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी असून त्यांची पातळीही चिंताजनक आहे, ज्यामुळे सिनेकाठची शेती संपूर्णपणे धोक्यात आली आहे.

भीमेवरील पाण्याचे केवळ पिण्यासाठी आरक्षण; शेतीची वीज खंडित
भीमा नदीवरील एकूण 24 बंधाऱ्यांपैकी 19 बंधारे महाराष्ट्राच्या हद्दीत येतात. या बंधाऱ्यांमध्ये आता केवळ 13.88 टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने या बंधाऱ्यांमधील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याचा उपसा रोखण्यासाठी शेतीसाठीचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला असून, शेतकऱ्यांना अत्यावश्यक कामांसाठी केवळ 2 तासांची सवलत दिली जात आहे.

हेही वाचा – Maharashtra Monsoon Update: खूशखबर! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात मान्सून होणार सक्रिय, हवामान विभागाने दिली माहिती

56 पैकी 44 तलाव कोरडे; विविध प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 56 लघु पाटबंधारे तलावांची स्थिती अत्यंत वाईट आहे, कारण या तलावांमध्ये सरासरी अवघा 4.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. होटगी तलावासारखे 12 तलाव वगळता उर्वरित 44 तलाव पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:
उजनी धरण: 00 TMC (उणे 24.37 टक्के)
एकरूख: 1.09 TMC (50.46 टक्के)
आष्टी: 0.53 TMC (64.75 टक्के)
मांगी: 0.30 TMC (27.98 टक्के)
जवळगाव: 0.23 TMC (21.93 टक्के)
हिंगणी पा.: 0.22 TMC (29.21 टक्के)
बोरी: 0.08 TMC (11.88 टक्के)
पिंपळगाव ढाळे: उणे 0.03 TMC (उणे 8.52 टक्के)

हेही वाचा – Rain Update Kharif Sowing: पावसाची दडी, घाईगडबडीत खरीप पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांचा मोलाचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number