Speed Post New Charges: इंडिया पोस्टच्या स्पीड पोस्ट सेवेचे दर 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. दळणवळण मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आता कागदपत्रे आणि पार्सल पाठवण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच दरांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्पीड पोस्टमध्ये नव्याने जोडलेली वैशिष्ट्ये
ऑनलाइन पेमेंट सुविधा: आता ग्राहक वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे त्वरित पेमेंट करू शकतील.
ओटीपी-आधारित डिलिव्हरी: पार्सल स्वीकारण्यासाठी ग्राहकाला ओटीपी दाखवावा लागेल, ज्यामुळे सुरक्षा अधिक वाढेल.
एसएमएस सूचना सेवा: पार्सलच्या प्रत्येक टप्प्याची माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे मिळणार.
ऑनलाइन बुकिंग: घरी बसून बुकिंगची सुविधा, वेळ आणि श्रमांची बचत.
रिअल-टाइम ट्रॅकिंग: वस्तू कुठे आहे हे क्षणाक्षणाला पाहता येईल.
नोंदणी सुविधा: नियमित वापरकर्त्यांसाठी सोपी नोंदणी, सुरक्षित डिलिव्हरी.
नवीन दर
50 ग्रॅम पर्यंतच्या वस्तूंसाठी 1 – 19 रुपये
51 ग्रॅम ते 250 ग्रॅमसाठी 24 रुपये
251 ग्रॅम ते 500 ग्रॅमसाठी 28 रुपये
200 किमी पर्यंत: 47 ते 70 रुपये (वजनानुसार)
501–1000 किमी किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी
50 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी 1- 47 रुपये
1001–2000 किमी: 47 ते 86 रुपये
2000 किमीपेक्षा जास्त अंतर: 47 ते 93 रुपये
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सुधारित दरांमुळे वाढत्या खर्चाची भरपाई होईल आणि ग्राहकांना सुरक्षित, जलद आणि आधुनिक सेवा मिळतील. यापूर्वी नोंदणीकृत पोस्ट सेवा बंद करून ती स्पीड पोस्टमध्ये विलीन करण्यात आली होती.