RBI Restriction: RBI कडून मुंबईतील ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेवर कडक निर्बंध; पैसे काढण्यावर 1 लाख रुपयांची मर्यादा

नवीन नियमांनुसार, आता या बँकेचा कोणताही ग्राहक आपल्या बचत (Savings), चालू (Current) किंवा इतर कोणत्याही खात्यातून एकूण मिळून जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाही.

RBI Restriction: RBI कडून मुंबईतील ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेवर कडक निर्बंध; पैसे काढण्यावर 1 लाख रुपयांची मर्यादा

RBI Restriction: मुंबईस्थित 'मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक' (Mogaaveera Co-operative Bank) ची आर्थिक स्थिती कमालीची खालावल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. आरबीआयने या सहकारी बँकेवर नवीन आर्थिक निर्बंध लादले असून, यामुळे खातेधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नवीन नियमांनुसार, आता या बँकेचा कोणताही ग्राहक आपल्या बचत (Savings), चालू (Current) किंवा इतर कोणत्याही खात्यातून एकूण मिळून जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाही. हे निर्बंध शुक्रवार, 12 जून 2026 रोजी बँकेचे कामकाज संपल्याच्या वेळेपासून पुढील 6 महिन्यांसाठी लागू करण्यात आले असून, या कालावधीत बँकेच्या व्यवहारांचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल.

नवीन कर्ज, ठेवी आणि गुंतवणुकीवर संपूर्ण बंदी
आरबीआयने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेला आता कोणतेही नवीन कर्ज किंवा आगाऊ रक्कम (Advances) मंजूर करता येणार नाही, तसेच जुन्या कर्जांचे नूतनीकरणही करता येणार नाही. याशिवाय, बँकेला बाजारात नवीन गुंतवणूक करण्यास, कोणतेही नवीन दायित्व निर्माण करण्यास, निधी उभारण्यास किंवा ग्राहकांकडून नवीन ठेवी (Deposits) स्वीकारण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. बँकेची सध्याची खालावलेली तरलता स्थिती (Liquidity Position) विचारात घेऊन ठेवीदारांच्या हितासाठीच प्रत्येक ग्राहकाला कमाल 1 लाख रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Mythos आणि Fable AI वर बंदी; Anthropic ची मोठी अपडेट समोर

व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कारवाई 
बँकेच्या कामकाजात सुधारणा व्हावी यासाठी आरबीआय सातत्याने बँकेचे संचालक मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या संपर्कात होते. मात्र, बँकेने आर्थिक आणि पर्यवेक्षकीय चिंतांचे निवारण करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. अखेर ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी हे निर्देश जारी करणे भाग पडल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे, आरबीआयने स्पष्ट केले आहे की या निर्बंधांचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना (Banking License) रद्द करणे असा अजिबात होत नाही. जोपर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही, तोपर्यंत बँक या मर्यादांच्या अधीन राहून आपले दैनंदिन बँकिंग कामकाज सुरू ठेवू शकते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number