Free Gas Offer: LPG टंचाईवर तोडगा; ग्राहकांना PNG कडे वळवण्यासाठी कंपन्यांकडून खास ऑफर्स

ग्राहकांनी आता सिलिंडरवर अवलंबून न राहता पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कडे वळावे, यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मोफत गॅस आणि सवलतींच्या आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

Free Gas Offer: LPG टंचाईवर तोडगा; ग्राहकांना PNG कडे वळवण्यासाठी कंपन्यांकडून खास ऑफर्स

Free Gas Offer:  देशातील LPG सिलिंडरच्या सद्यस्थितीबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. गॅस तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये पसरलेली घबराट कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ग्राहकांनी आता सिलिंडरवर अवलंबून न राहता पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कडे वळावे, यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मोफत गॅस आणि सवलतींच्या आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामुळे केवळ पैशांची बचत होणार नाही, तर सिलिंडर बुकिंगच्या त्रासातूनही मुक्तता मिळणार आहे.

मोफत गॅस आणि सुरक्षा ठेव शुल्कात मोठी सवलत
LPG वरून PNG कडे वळणाऱ्या ग्राहकांसाठी विविध कंपन्यांनी सवलतींचा पाऊस पाडला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने 31 मार्चपूर्वी नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना 500 रुपयांचा मोफत गॅस देण्याची घोषणा केली आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने नवीन घरगुती कनेक्शनसाठीचे 500 रुपयांचे नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. व्यावसायिक ग्राहकांसाठी ही सवलत अधिक मोठी असून, 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतची सुरक्षा ठेव (Security Deposit) माफ करण्यात आली आहे. तसेच, BPCL ने व्यावसायिक कनेक्शन्ससाठी सुरक्षा ठेवीची अट रद्द केली असून, गेल गॅस (GAIL) देखील नवीन ग्राहकांना 500 रुपयांचा मोफत गॅस देणार आहे.

साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा 'ॲक्शन प्लॅन' आणि छापे
देशभरात काही ठिकाणी सुरू असलेला गॅसचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. विविध राज्यांमध्ये प्रशासनाकडून छापे टाकले जात असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष नियंत्रण कक्ष (Control Rooms) स्थापन करण्यात आले आहेत. सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, गॅसचा कोणताही तुटवडा नाही; उलट ऑनलाइन बुकिंगचे प्रमाण 84 टक्क्यावरून 87 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ज्यांच्याकडे आधीच PNG कनेक्शन उपलब्ध आहे, त्यांनी आपले LPG कनेक्शन सरेंडर करणे कायदेशीररित्या अनिवार्य असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.

हेही वाचा – Difference Between Lpg Cng & Png: सिलेंडरमधला LPG, पाइपमधला PNG आणि गाडीतला CNG; पण 'या' तिन्ही गॅसमध्ये नेमका फरक काय?

घबराट नको; डिजिटल बुकिंग आणि सुरक्षिततेवर भर
सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, अनावश्यक साठेबाजीसाठी गॅसचे आगाऊ बुकिंग करू नये. बुकिंगसाठी जास्तीत जास्त डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा, जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता राहील. शनिवार 14 मार्च रोजी 7.7 दशलक्ष सिलिंडर्सचे बुकिंग झाले असून, पुरवठा साखळी सुरळीत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी सुरक्षित आणि स्वस्त पर्यायाचा विचार करून आपल्या घरी पाइप गॅस कनेक्शन घेण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून भविष्यातील गॅस टंचाईच्या संकटापासून वाचता येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number