LPG Cylinder On Instamart: गॅस कनेक्शनचं टेन्शन संपलं; आता इन्स्टामार्टवरून अवघ्या काही मिनिटांत मिळणार LPG सिलेंडर ?

प्रसिद्ध क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'इन्स्टामार्ट'ने (Instamart) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे.

LPG Cylinder On Instamart: गॅस कनेक्शनचं टेन्शन संपलं; आता इन्स्टामार्टवरून अवघ्या काही मिनिटांत मिळणार LPG सिलेंडर ?

LPG Cylinder On Instamart: घरामध्ये एलपीजी गॅस कनेक्शन नसलेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कोणत्याही पारंपारिक गॅस कनेक्शनशिवाय थेट घरी एलपीजी सिलेंडर मागवणे शक्य झाले आहे. प्रसिद्ध क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'इन्स्टामार्ट'ने (Instamart) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून देशातील पहिली 'ऑन-डिमांड' एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आली असून, सध्या ही सुविधा कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोकरीच्या निमित्ताने राहणारे व्यावसायिक, विद्यार्थी आणि भाडेकरू यांच्यासाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम आपली 'केवायसी' (KYC) पडताळणी पूर्ण करावी लागेल. डिलिव्हरीच्या वेळी आवश्यक असलेली केवायसी कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असून, त्यानंतरच सिलेंडर रिफिलची पुढील प्रक्रिया केली जाईल. विशेष म्हणजे, नवीन सिलेंडर घेताना ग्राहकांना एक रिकामे सिलेंडर परत देणे आवश्यक असेल. इन्स्टामार्टवर नोंदवल्या गेलेल्या सर्व ऑर्डर्सची पूर्तता ही HPCL च्या अधिकृत आणि नोंदणीकृत वितरकांच्या नेटवर्कमार्फत केली जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि खात्रीशीर सेवा मिळेल.

पारदर्शक सिलेंडरमुळे गॅसची पातळी रोज तपासता येणार
या नवीन करारानुसार, हिंदुस्तान पेट्रोलियमने खास 'HP Navya' (एचपी नव्या) नावाचे 10 किलो वजनाचे 'कंपोझिट' एलपीजी सिलेंडर बाजारात आणले आहे. याशिवाय ग्राहकांना 5 किलोचे पारंपारिक धातूचे सिलेंडरही बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. पारंपरिक स्टील सिलेंडरला एक हलका आणि गंज न लागणारा आधुनिक पर्याय म्हणून या 'HP Navya' सिलेंडरकडे पाहिले जात आहे. 

हेही वाचा – Share Market Closing: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर बंद, 'या' शेअर्समध्ये जोरदार खरेदी

या सिलेंडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची बॉडी अंशतः पारदर्शक आहे, ज्यामुळे ग्राहकांना सिलेंडरमध्ये शिल्लक असलेल्या गॅसची पातळी रोजच्या रोज स्वतः डोळ्यांनी पाहता येणार आहे. ही कॉम्पॅक्ट रचना लहान कुटुंबे किंवा अतिरिक्त सिलेंडरची गरज असणाऱ्या घरांसाठी अत्यंत सोयीची आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number