Kamgar Ayuktalay Bharti 2026 : कामगार विभागात सरळसेवा भरती जाहीर! तब्बल 1 लाखाहून अधिक पगाराची नोकरी; जाणून घ्या डिटेल्स

या नवीन भरती मोहिमेद्वारे कामगार आयुक्तालयातील एकूण 78 रिक्त जागांवर उमेदवारांची थेट निवड केली जाईल.

Kamgar Ayuktalay Bharti 2026 : कामगार विभागात सरळसेवा भरती जाहीर! तब्बल 1 लाखाहून अधिक पगाराची नोकरी; जाणून घ्या डिटेल्स

Kamgar Ayuktalay Bharti 2026 : महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय, मुंबई यांच्या वतीने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि पात्र तरुण-तरुणींसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. कामगार विभागाने सरळसेवा परीक्षा 2026 अंतर्गत 'गट-क' संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील 22 माथाडी मंडळे आणि 12 सुरक्षा रक्षक मंडळांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरली जाणार असून, ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिना 1 लाख 12 हजार रुपयांपर्यंतची अत्यंत आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे.

तीन वेगवेगळ्या पदांसाठी 78 जागांवर होणार नियुक्ती
या नवीन भरती मोहिमेद्वारे कामगार आयुक्तालयातील एकूण 78 रिक्त जागांवर  (निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक) उमेदवारांची थेट निवड केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने 'गट-क' मधील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या तीन महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. शासनाच्या नियमांनुसार आणि गरजेनुसार भविष्यात या एकूण पदसंख्येत बदल किंवा वाढ होण्याची शक्यता देखील प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर अटींची माहिती घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; 'ही' आहे अंतिम तारीख
या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 13 मे 2026 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी 11 जून 2026 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. तसेच, अर्जासोबत भरायचे विहित परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यासाठी रेल्वे/बँकिंग यंत्रणेद्वारे 12 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेत आपले अर्ज पूर्ण करावेत. या अधिकृत संकेतस्थळावर https://mahakamgar.maharashtra.gov.in अर्ज करावेत. तसेच, अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
अर्जाची लिंक – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html

हेही वाचा – NEET UG 2026 Exam Cancelled: नीट यूजी 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, आता होणार फेरपरीक्षा

Kamgar Vibhag Bharti 2026 Salary Details: रिक्त पदांचा तपशील आणि वेतन श्रेणी:
या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध संवर्गातील एकूण 78 पदे भरली जाणार आहेत. शासनाच्या सूचनेनुसार भविष्यात या पदसंख्येत बदल किंवा वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील पदांचा समावेश आहे:
1. निरीक्षक (62 पदे): या पदासाठी रु. 35 हजार 400 ते रु. 1 लाख 12 हजार 400 (वेतन श्रेणी एस-13) अधिक नियमानुसार देय भत्ते मिळतील.
2. लेखापाल (12 पदे): या पदासाठी देखील रु. 35 हजार 400 ते रु. 1 लाख 12 हजार 400 (वेतन श्रेणी एस-13) हीच आकर्षक वेतन श्रेणी लागू आहे.
3. लघुटंकलेखक (04 पदे): या पदासाठी रु. 25 हजार 500 ते रु.81 हजार 100 (वेतन श्रेणी एस-8) सह इतर भत्ते देय असतील.

Kamgar Ayuktalay Recruitment Eligibility Criteria: शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:
निरीक्षक आणि लघुटंकलेखक या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. लघुटंकलेखक पदासाठी पदवीसोबतच मराठी/इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. लेखापाल पदासाठी वाणिज्य शाखेची (B.Com) पदवी आणि संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव मागण्यात आला आहे. सर्वच पदांसाठी मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांची किमान वयोमर्यादा 19 वर्षे असून, कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) तसेच अनाथांसाठी ४३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. दिव्यांग आणि प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

हेही वाचा – Maharashtra FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर! 15 लाख विद्यार्थ्यांसाठी 21 लाख जागा उपलब्ध; असे असेल प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number