Income Tax Return : तुम्ही ITR भरताना ही चूक तर केली नाही ना? ‘डिजिटल ट्रॅकिंग’मुळे छोटीशी चूकही पडू शकते महागात

अनेकदा लोक ITR भरल्यानंतर आपले काम संपले असे मानतात; पण खरी अडचण लहान-सहान चुकांमध्ये दडलेली असते. यामुळे प्राप्तीकर विभागाची नोटीससुद्धा येऊ शकते. जाणून घेऊ, या कोणत्या चुका आहेत?

Income Tax Return : तुम्ही ITR भरताना ही चूक तर केली नाही ना? ‘डिजिटल ट्रॅकिंग’मुळे छोटीशी चूकही पडू शकते महागात

Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजेच आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरताना थोडीशी निष्काळजीपणाही मोठी समस्या निर्माण करू शकते. अनेकदा लोक ITR भरल्यानंतर आपले काम संपले असे मानतात; पण खरी अडचण लहान-सहान चुकांमध्ये दडलेली असते. चुकीची माहिती देणे किंवा अपुरी माहिती भरणे, यामुळे आयकर विभागाकडून (Income Tax Department) नोटीस (Notice) येण्याची शक्यता खूप वाढते. आता डिजिटल ट्रॅकिंग (Digital Tracking) अधिक मजबूत झाल्यामुळे, तुमची अगदी किरकोळ चूकही पकडली जाऊ शकते, त्यामुळे प्रत्येक तपशील योग्य आणि पूर्णपणे तपासणी करून भरणे महत्त्वाचे आहे.

नोटीस का येते आणि काय करायला हवे?
अनेक लोकांना वाटते की करचोरी (Tax Evasion) करणाऱ्यांनाच केवळ आयकर विभागाची नोटीस मिळते, पण ITR मध्ये झालेल्या चुकांमुळेही नोटीस येते. ही नोटीस साधारणपणे ई-मेल (E-mail) किंवा डिजिटल पोर्टलवर उपलब्ध असते. या नोटीसमध्ये नेमकी कोणती आणि किती रकमेची गडबड झाली आहे, याची माहिती दिलेली असते आणि ती सुधारण्यासाठी वेळही दिला जातो. काहीवेळा ही नोटीस केवळ माहिती देण्यासाठी असते. परंतु, काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अतिरिक्त कर (Extra Tax) किंवा दंड (Penalty) भरावा लागू शकतो. नोटीस आल्यास घाबरून न जाता, फॉर्म आणि बँक कागदपत्रे (Bank Documents) काळजीपूर्वक तपासून चूक सुधारणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Share Market News : ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअर्सना येणार उसळी? गुंतवणूकदारांना होऊ शकतो मोठा फायदा

ITR भरताना कोणत्या चुका टाळाव्यात?
ITR भरण्यापूर्वी आपल्या उत्पन्नाची (Income), टॅक्स क्रेडिट (Tax Credit) आणि पॅन (PAN) क्रमांकाची माहिती तपासावी. टीडीएस (TDS) किंवा 26AS स्टेटमेंट तपासले नाही, तर नंतर नोटीस येण्याची शक्यता वाढते. उत्पन्न चुकीच्या 'कॅटेगरी'मध्ये (Category) भरणे, चुकीचा पॅन नंबर देणे, टॅक्स क्रेडिट किंवा सेक्शनमध्ये (Section) चूक करणे, या सामान्य चुका आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना सेक्शन आणि डिडक्शन (Deduction) अचूक भरावे, बँक खात्याचे तपशील तपासावेत आणि शक्य असल्यास डिजिटल पावत्या (Digital Receipts) किंवा स्लिप्सचा रेकॉर्ड ठेवावा.

चुका टाळण्यासाठी सोपे उपाय
ITR मध्ये होणाऱ्या लहान चुकांपासून वाचण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे एखाद्या व्यावसायिक कर सल्लागार (Tax Consultant) किंवा सॉफ्टवेअरची मदत घेणे. ही सॉफ्टवेअर स्वयंचलित (Automatic) पद्धतीने तपासणी करतात आणि त्यामुळे मानवी चुका टाळता येतात. या छोट्या-छोट्या चुका टाळून तुम्ही नोटीस येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी करू शकता आणि तुमचे ITR योग्य पद्धतीने दाखल करू शकता.

हेही वाचा – India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी! दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये 8.2 टक्क्यांची वाढ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number