RBI New Rules 2026: क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे! RBI चे तीन नवीन नियम लागू; एक चूक अन् स्कोअर…

पारदर्शकता आणण्यासाठी 3 क्रांतीकारक बदल केले आहेत. 1 जानेवारी 2026 पासून अंमलात येणारे हे नियम क्रेडिट कार्ड वापरकर्ते आणि कर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

RBI New Rules 2026: क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे! RBI चे  तीन नवीन नियम लागू;  एक चूक अन् स्कोअर…

RBI New Rules 2026 : रिझर्व्ह बँकेने (RBI) नवीन वर्षात ग्राहकांच्या आर्थिक हितासाठी आणि बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी 3 क्रांतीकारक बदल केले आहेत. 1 जानेवारी 2026 पासून अंमलात येणारे हे नियम क्रेडिट कार्ड वापरकर्ते आणि कर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. काय आहेत हे नियम सविस्तर जाणून घेऊयात. 

1. क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट होणार 

तुमचा क्रेडिट रिपोर्ट (CIBIL इ.) आता महिन्याऐवजी आठवड्यातून 4 वेळा अपडेट केला जाईल. जर तुम्ही तुमचे कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले, तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर लगेच दिसून येईल. तथापी, बिल भरण्यास किंवा EMI चुकवल्यास तुमचा स्कोअर काही दिवसांतच खाली येईल. त्यामुळे आर्थिक शिस्त पाळणे आता पूर्वीपेक्षा जास्त अनिवार्य झाले आहे.

2. कर्ज वेळेआधी फेडल्यास 'पेनल्टी' मधून सुटका 

गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज (Floating Rate Loans) घेणाऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. 1 जानेवारी 2026 पासून बँकांना 'प्रीपेमेंट' किंवा 'फोरक्लोजर' शुल्क आकारता येणार नाही. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. ग्राहकांकडे पैसे असल्यास ते दंडाशिवाय आपले कर्ज मुदतीपूर्वी बंद करू शकतात किंवा चांगल्या व्याजदरासाठी दुसरी बँक निवडू शकतात.

हेही वाचा – Silver Price: चांदीच्या भावात रेकॉर्डब्रेक वाढ; पहिल्यांदाच 3 लाखांच्या पुढे दर, या तेजीमागचं नेमकं कारण काय?

3. बंद पडलेल्या (Dormant) खात्यांवर 'आरबीआय'ची करडी नजर 

जुन्या आणि वापरात नसलेल्या बँक खात्यांबाबत आरबीआयने नियम कडक केले आहेत. सलग 12 महिने व्यवहार न झाल्यास खाते 'इन-ॲक्टिव्ह' मानले जाईल, तर 2 वर्षे व्यवहार न झाल्यास ते 'डॉर्मेंट' (सुप्त) श्रेणीत जाईल. सायबर फसवणूक, मनी लाँडरिंग आणि ओळखीचा गैरवापर रोखण्यासाठी बँकांना अशा खात्यांचे नियमित केवायसी (KYC) अपडेट करणे बंधनकारक आहे.

सामान्य ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

ग्राहकांनी आठवड्यातून 1 वेळा आपला क्रेडिट रिपोर्ट तपासा. तसेच जास्तीचे शुल्क नसल्यामुळे बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यास कर्जाचे मुद्दल कमी करण्यावर भर द्या. तुमचे जुने बँक खाते बंद होऊ नये म्हणून किमान 6 महिन्यांतून 1 वेळा लहान-मोठा व्यवहार नक्की करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number