DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, पाहा किती वाढणार तुमचा पगार

केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली असून, यामुळे आता DA 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचला आहे.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, पाहा किती वाढणार तुमचा पगार

DA Hike: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली असून, यामुळे आता DA 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा देशातील सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. 'अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक' (AICPI-IW) च्या आकडेवारीनुसार ही वाढ अपेक्षित होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

पगारात आणि निवृत्तीवेतनात किती वाढ होणार?
महागाई भत्त्यातील या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 36,500 रुपये असेल, तर 2 टक्क्यांच्या वाढीनंतर त्यांचा महागाई भत्ता 21,170 रुपयांवरून वाढून 21,900 रुपये होईल. तसेच त्यांना जानेवारी महिन्यापासूनची थकबाकी (Arrears) देखील दिली जाणार आहे. दुसरीकडे, ज्या निवृत्तीवेतनधारकांचे मूळ निवृत्तीवेतन 9,000 रुपये आहे, त्यांच्या पेन्शनमध्ये दरमहा 180 रुपयांची वाढ होऊन ती 5,400 रुपये (महागाई दिलासा) इतकी होईल.

'सॉवरेन मॅरिटाइम फंड' आणि ग्रामीण रस्त्यांसाठी मोठी तरतूद
केवळ कर्मचारीच नव्हे, तर पायाभूत सुविधा आणि सागरी क्षेत्रासाठीही मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भारतीय जहाजांना परवडणारे विमा संरक्षण देण्यासाठी 13,000 कोटी रुपयांच्या निधीसह 'सॉवरेन मॅरिटाइम फंड' स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच, 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना' आता 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी 3,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा – Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना 'सुवर्ण'संधी! ऐन सणाआधी सोने-चांदीच्या दरांत मोठी घसरण; पाहा आजचे दर

वर्षातून दोनदा सुधारणा करण्याची पद्धत
केंद्र सरकार महागाईच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारणा करते. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. ताज्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडणार असला तरी, महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number