Mercedes-Benz Burial : अंत्यसंस्कारांची अजब तऱ्हा! दीड कोटींची मर्सिडीज कार जमिनीत पुरली; मग…

या कृत्यामुळे सोशल मीडियावर वाद सुरू होऊन दोन गट पडले आहेत. अनेक पर्यावरणप्रेमी आणि नेटिझन्सनी याला संसाधनांचा भयानक अपव्यय म्हटले आहे.

Mercedes-Benz Burial : अंत्यसंस्कारांची अजब तऱ्हा! दीड कोटींची मर्सिडीज कार जमिनीत पुरली; मग…

Mercedes-Benz Luxury Car Buried in Funeral in China : आयुष्यभर कमावलेली संपत्ती मृत्यूनंतर सोबत नेता येत नाही, असं म्हटलं जातं. पण चीनमधील एका श्रीमंत कुटुंबाने हा नियम मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. लियाओनिंग प्रांतात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने चक्क त्याची लाडकी आलिशान कार त्याच्यासोबतच कबरीत दफन केली. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर वणव्यासारखा पसरला असून, यामुळे संपूर्ण चीनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परलोकातील प्रवासात मृत व्यक्तीला आराम मिळावा, या अजब धारणेपायी कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

आलिशान गाडी केली दफन
दफन करण्यात आलेली कार ही साधीसुधी नसून ती Mercedes-Benz S450L ही महागडी मॉडेल होती. या आलिशान गाडीची किंमत अंदाजे 15 लाख युआन म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 1.49 कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, या गाडीचा नंबर ‘8888’ असा होता, जो चिनी संस्कृतीत अत्यंत शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. व्हायरल व्हिडिओमध्ये एक अवाढव्य एक्स्कॅव्हेटर ही काळ्या रंगाची मर्सिडीज कार एका मोठ्या खड्ड्यात उतरवताना आणि त्यानंतर त्यावर माती टाकताना स्पष्टपणे दिसत आहे.

‘संसाधनांचा भयानक अपव्यय’ – नेटिझन्सची टीका
या कृत्यामुळे सोशल मीडियावर वाद सुरू होऊन दोन गट पडले आहेत. अनेक पर्यावरणप्रेमी आणि नेटिझन्सनी याला संसाधनांचा भयानक अपव्यय म्हटले आहे. जमिनीत एवढी मोठी लोखंडी वस्तू आणि त्यातील इंधन, बॅटरी पुरणे पर्यावरणासाठी घातक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. दुसरीकडे, काही लोकांनी ही त्या कुटुंबाची वैयक्तिक श्रद्धा असून मृताचा सन्मान करण्याचा तो एक मार्ग असू शकतो, असे म्हणत कुटुंबाची पाठराखण केली. मात्र, विरोधाचा सूर अधिक तीव्र असल्याने स्थानिक प्रशासनाला यात हस्तक्षेप करावा लागला.

हेही वाचा – Toxic Work Culture: ‘कोणाला सांगून आजारी पडलास?’ सिक लीव्ह मागितल्यावर बॉसचा विचित्र सवाल; मॅनेजरच्या वागणुकीवर नेटकरी संतापले

कुटुंबाला कडक ताकीद आणि चौकशी
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरी व्यवहार विभागाने या घटनेची दखल घेत कुटुंबाला कडक ताकीद दिली आहे. अधिकाऱ्यांनी या प्रथेला “अंधश्रद्धा” ठरवत अशा कृतींमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, आता त्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर, पुरलेली गाडी कबरीतून बाहेर काढणे आणि त्या जागेची पुनर्रचना करण्याची जबाबदारीही कुटुंबावर टाकली जाऊ शकते.

प्रशासनाचा दबाव, सार्वजनिक रोष आणि कुटुंबाची जाहीर माफी
प्रशासनाचा दबाव आणि सार्वजनिक रोष वाढल्यानंतर अखेर त्या भेदरलेल्या कुटुंबाने जाहीर माफी मागितली आहे. आपली कृती पारंपारिक श्रद्धेवर आधारित होती, कोणालाही त्रास देण्याचा आपला हेतू नव्हता, असा बचाव त्यांनी केला. मात्र, आधुनिक काळात अशा प्रकारच्या प्रथांना स्थान नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ‘साउथ मॉर्निंग चायना पोस्ट’च्या वृत्तानुसार, चीनमधील वाढत्या भौतिकवादी अंत्यसंस्कारांच्या पद्धतींवर आता सरकारी पातळीवरून अधिक निर्बंध येण्याची चिन्हं दिसत आहेत.

हेही वाचा – Konkan Railway Viral Video: कोकण रेल्वेत मराठी माणसाचा अपमान; कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशाची रत्नागिरी स्थानकावर परवड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number