LPG eKYC Update: LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! ई-केवायसीची मुदत संपली; आता पुन्हा करावी लागणार ReKYC ?

गॅस कनेक्शनचे आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दिलेली 14 सप्टेंबर 2026 ही अंतिम मुदत आता संपुष्टात आली आहे.

LPG eKYC Update: LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! ई-केवायसीची मुदत संपली; आता पुन्हा करावी लागणार ReKYC ?

LPG eKYC Update: देशभरातील घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (eKYC) प्रक्रियेशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गॅस कनेक्शनचे आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दिलेली 14 सप्टेंबर 2026 ही अंतिम मुदत आता संपुष्टात आली आहे. यानंतर, ज्या ग्राहकांनी एकदा ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा 'री-केवायसी' (Re-KYC) करावी लागेल का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर स्पष्टीकरण समोर आले असून, सामान्यतः एकदा बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे पडताळणी पूर्ण झाल्यावर पुन्हा-पुन्हा केवायसी करण्याची आवश्यकता नसते, ज्यामुळे लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माहितीतील बदल अन् 'उज्ज्वला योजने'च्या लाभार्थ्यांसाठी वेगळे नियम

नेहमी री-केवायसीची गरज नसली, तरी ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीत काही बदल झाल्यास ही प्रक्रिया पुन्हा करावी लागू शकते. जर एखाद्या ग्राहकाने आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, राहता पत्ता किंवा गॅस कनेक्शनशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती बदलली असेल, तर त्यांना आपल्या संबंधित एलपीजी वितरकाकडे जाऊन केवायसी तपशील अपडेट करणे अनिवार्य राहील. याशिवाय, 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या (PMUY) लाभार्थ्यांसाठी सरकारी अनुदानाचा (Subisdy) लाभ अखंडितपणे सुरू राहण्यासाठी विशेष नियम लागू असू शकतात. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून री-केवायसीची आवश्यकता आहे की नाही, याची खातरजमा करणे गरजेचे आहे.

हेही वाचा – EPF Wage Ceiling Hike: EPF ची मासिक वेतन मर्यादा 15,000 वरून थेट 25,000 रुपयांवर; कर्मचाऱ्यांना कसा होणार फायदा?

ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी काय करावे? 

दरम्यान, ज्या एलपीजी ग्राहकांनी अद्याप कोणतीही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी गॅस पुरवठा खंडित होणे किंवा अनुदानापासून वंचित राहणे टाळण्यासाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. उज्ज्वला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच गॅस कंपन्यांच्या डिजिटल पोर्टलवर केवायसी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे "एकदा केवायसी झाली म्हणजे पुन्हा कधीच गरज पडणार नाही" असा गैरसमज न बाळगता, आपल्या कनेक्शनच्या स्थितीनुसार वेळेवर माहिती अपडेट ठेवणे सर्व ग्राहकांसाठी हिताचे ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number