BHIM App Cashback Offer : BHIM ॲपमध्ये कॅशबॅकचा पाऊस ; महाबचतीचा मोठी संधी, कसा घ्याल फायदा?

भारतात ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. BHIM ॲपचा 9 वा वर्धापनदिन (BHIM App 9th Anniversary) जवळ येत असून, या निमित्ताने ॲपने युजर्सना कास ऑपर दिली आहे.

BHIM App Cashback Offer : BHIM ॲपमध्ये कॅशबॅकचा पाऊस ; महाबचतीचा मोठी संधी, कसा घ्याल फायदा?

BHIM App Cashback Offer : भारतात ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. लहान दुकानदारांपासून मोठ्या आस्थापनांपर्यंत सर्वत्र UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पेमेंटने (Online Payment) अनेक कामे सोपी केली आहेत; आता वारंवार ATM मध्ये जाऊन कॅश काढण्याची (Cash Withdrawal) किंवा सुटे पैसे ठेवण्याची चिंता राहिलेली नाही. देशातील बहुतेक लोक पेमेंटसाठी UPI चा वापर करत आहेत.

9 व्या वर्धापनदिनानिमित्त बंपर कॅशबॅक
या दरम्यान, BHIM पेमेंट्स ॲपने आपल्या युजर्सना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. BHIM ॲपचा 9 वा वर्धापनदिन (BHIM App 9th Anniversary) जवळ येत असून, या निमित्ताने ॲपने युजर्सना 100 टक्के कॅशबॅकची (BHIM App 100% Cashback) तगडी ऑफर दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ॲपने पोस्ट करून या विशेष कॅशबॅक ऑफरची (Cashback Offer) माहिती दिली आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी किमान 20 रुपयांचा व्यवहार करणे आवश्यक आहे.

BHIM ॲपची गौरवशाली वाटचाल
डिजिटल इंडियाची (Digital India) ओळख बनलेल्या BHIM ॲपचा वर्धापनदिन याच महिन्याच्या अखेरीस आहे. 30 डिसेंबर 2016 रोजी BHIM ॲपची सुरुवात झाली होती. तेव्हापासून सुरू झालेल्या या प्रवासाने देशात डिजिटल पेमेंटला (Digital Payment) सोपे आणि विश्वासार्ह बनवले आहे. आता आपल्या वर्धापनदिनानिमित्त BHIM ॲप आपल्या युजर्सना कॅशबॅकचा मोठे गिफ्ट देत आहे.

हेही वाचा – Loan Waiver : सार्वजनिक बँकांकडून 6 लाख कोटींची कर्जमाफी; बँकांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा सरकारचा संसदेत दावा

वीज बिल भरण्यावरही बंपर सूट
रिपोर्टनुसार, BHIM पेमेंट ॲपवर सध्या सुरू असलेल्या कॅशबॅक ऑफरच्या अंतर्गत, आता वीज बिल भरतानाही ग्राहकांना बचत रण्याची संधी मिळत आहे. ही ऑफर बीएसईएस राजधानी पॉवर कंपनीने दिली आहे, जी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि दिल्ली सरकारचा  एक संयुक्त उपक्रम आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, BHIM ॲपने वीज बिल भरल्यास ग्राहकांना इंस्टंट कॅशबॅक मिळू शकतो.

ऑफर 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध
वीज बिलावर मिळणाऱ्या या कॅशबॅकची सुविधा 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध राहील. पेमेंट करताना चेकआऊटवर BillDesk पर्याय निवडणे आवश्यक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक ग्राहक या ऑफरचा फायदा महिन्यातून एकदाच घेऊ शकतो. कॅशबॅक मिळवण्यासाठी किमान 500 रुपयांचे बिल भरणे गरजेचे आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो, जो थेट त्यांच्या BHIM ॲपशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल.

हेही वाचा – Stock Market Closing: गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! सेन्सेक्स 2 दिवसांत 1000 अंकांनी घसरला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number