ATM Withdrawal Rules: 1 एप्रिलपासून ATM मधून पैसे काढणे महागणार; ‘या’ 3 मोठ्या बँकांच्या नियमांत होणार मोठा बदल

1 एप्रिल 2026 पासून देशातील प्रमुख बँकांनी ATM व्यवहारांच्या नियमांत आणि शुल्कामध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत.

ATM Withdrawal Rules: 1 एप्रिलपासून ATM मधून पैसे काढणे महागणार; ‘या’ 3 मोठ्या बँकांच्या नियमांत होणार मोठा बदल

ATM Withdrawal Rules: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून देशातील प्रमुख बँकांनी ATM व्यवहारांच्या नियमांत आणि शुल्कामध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बंधन बँक यांनी आपल्या ग्राहकांसाठी रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत कपात आणि अतिरिक्त शुल्काची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकिंग व्यवहारांचे नियोजन करताना हे नवीन नियम समजून घेणे आता अनिवार्य झाले आहे.

HDFC बँक: आता UPI मधून पैसे काढणेही येणार मर्यादेत
HDFC बँकेने आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला असून, आता ATM मधून UPI द्वारे काढलेली रोख रक्कम देखील तुमच्या 'मासिक मोफत व्यवहारांच्या मर्यादेत' गणली जाईल. यापूर्वी UPI आधारित व्यवहारांना वेगळी सवलत होती, मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. जर तुम्ही तुमची मासिक मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडली, तर त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला 23 अधिक लागू कर (Taxes) भरावे लागतील.

PNB: दैनंदिन पैसे काढण्याच्या मर्यादेत मोठी कपात
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ATM मधून पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा (Daily Limit) लक्षणीयरीत्या कमी केली आहे. काही विशिष्ट डेबिट कार्ड्ससाठी ही मर्यादा 1 लाखावरून थेट 50,000 करण्यात आली आहे. तर, प्रीमियम कार्डधारकांसाठी ही मर्यादा 1.5 लाखांवरून कमी करून 75,000 करण्यात आली आहे. मोठ्या रकमेची गरज असल्यास आता ग्राहकांना एकापेक्षा जास्त वेळा ATM ला भेट द्यावी लागणार आहे.

हेही वाचा – Airlines Oppose 60 Percent Free Seat : मोफत सीट निवडीच्या निर्णयाला विमान कंपन्यांचा विरोध; प्रवाशांच्या खिशावर वाढणार भार?

बंधन बँक: व्यवहारांच्या मर्यादेनंतर मोजावे लागणार जास्तीचे शुल्क
बंधन बँकेने त्यांच्या स्वतःच्या आणि इतर बँकांच्या ATM वापरासाठी नवीन शुल्क रचना लागू केली आहे. बँकेच्या स्वतःच्या ATM वर दरमहा 5 मोफत व्यवहार मिळतील. मात्र, इतर बँकांच्या ATM वर मेट्रो शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद) फक्त 3, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करता येतील. ही मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 23 आणि गैर-आर्थिक व्यवहारासाठी (उदा. बॅलन्स चेक) 10 शुल्क आकारले जाईल. विशेष म्हणजे, खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 दंड आकारला जाणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number