CM Joseph Vijay Cabinet Tamilnadu: तामिळनाडू राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार! जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळात डिजीटल कंटेट क्रिएटर ते डेंटिस्ट…; जाणून घ्या कोणाची नावं समाविष्ट

विजय यांच्या या पहिल्याच मंत्रिमंडळात प्रशासकीय अनुभव, राजकीय अनुभव आणि तरुण रक्ताचा एक अनोखा संगम पाहायला मिळत आहे.

CM Joseph Vijay Cabinet Tamilnadu: तामिळनाडू राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार! जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळात डिजीटल कंटेट क्रिएटर ते डेंटिस्ट…; जाणून घ्या कोणाची नावं समाविष्ट

CM Joseph Vijay Cabinet: तामिळनाडूच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाचा श्रीगणेश झाला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि आता राज्याचे मुख्यमंत्री बनलेले सी. जोसेफ विजय यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, विजय यांच्या या पहिल्याच मंत्रिमंडळात प्रशासकीय अनुभव, राजकीय अनुभव आणि तरुण रक्ताचा एक अनोखा संगम पाहायला मिळत आहे. या शपथविधी सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आवर्जून उपस्थिती लावत विजय यांच्या शेजारी बसून या नव्या मैत्रीचे संकेतही दिले.

अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांची सांगड
विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) सरकारने पहिल्याच टप्प्यात 9 प्रमुख मंत्र्यांना स्थान दिले आहे. यामध्ये एका माजी आयआरएस अधिकाऱ्यापासून ते चक्क मुख्यमंत्री विजय यांच्या जुन्या मॅनेजरपर्यंत विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे.

विजय यांच्या मंत्रिमंडळातील 9 शिलेदार

1. एन. आनंद (सरचिटणीस): पक्षाचा मुख्य चेहरा आणि प्रवक्ते म्हणून ओळखले जाणारे आनंद आता मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावतील.

2. के. जी. अरुण राज (माजी IRS अधिकारी): प्रशासकीय कौशल्याची जोड देण्यासाठी विजय यांनी माजी आयआरएस अधिकारी अरुण राज यांना संधी दिली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला धोरण आखणीत होईल.

3. एस. कीर्तना (सर्वात तरुण मंत्री): अवघ्या 29 वर्षांच्या कीर्तना या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण आणि एकमेव महिला मंत्री आहेत. त्यांनी शिवपासी मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

4. राजमोहन (अभिनेता-दिग्दर्शक): सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर राजमोहन आता राजकारणाच्या मुख्य प्रवाहात मंत्रिपदाची धुरा सांभाळतील.

5. आर. निर्मलकुमार: भाजपच्या सोशल मीडिया सेलचे माजी प्रमुख राहिलेले निर्मलकुमार यांच्याकडे आधुनिक प्रचार आणि तंत्रज्ञानाची मोठी जबाबदारी असण्याची शक्यता आहे.

6. पी. वेंकेटरामनन: मुख्यमंत्र्यांचे जुने विश्वासू सहकारी आणि 2000 सालातील त्यांचे मॅनेजर राहिलेले वेंकेटरामनन यांचा मंत्रिमंडळात समावेश करून विजय यांनी आपल्या निष्ठवंतांना मोठे बक्षीस दिले आहे.

7. के. ए. सेंगोट्टैयन: एआयएडीएमके (AIADMK) मधून आलेले सेंगोट्टैयन हे या टीममधील सर्वात अनुभवी राजकारणी आहेत.

8. आधव अर्जुन: पक्षाचे मुख्य रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे अर्जुन विल्लिवक्कम मतदारसंघातून निवडून आले आहेत.

9. डॉ. टी. के. प्रभू: व्यवसायाने डेंटिस्ट असलेले डॉ. प्रभू पहिल्यांदाच आमदार झाले असून थेट मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

हेही वाचा – Joseph Vijay Govt Decisions: मुख्यमंत्री होताच जोसेफ विजय यांनी केली 'या' फाईलवर पहिली सही; पहिल्याच दिवशी घेतले 3 मोठे निर्णय

मुख्यमंत्री विजय यांनी केवळ राजकीय सोय न पाहता, प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांतील जाणकारांना आपल्या सोबत घेतले आहे. आता ही नवी टीम तामिळनाडूचा चेहरामोहरा कशी बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number