Milk Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! अमूलनंतर आता ‘या’ कंपनीनेही वाढवले दुधाचे दर

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुधाच्या दरवाढीची झळ बसणार आहे.

Milk Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! अमूलनंतर आता ‘या’ कंपनीनेही वाढवले दुधाचे दर

Milk Price Hike: पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुधाच्या दरवाढीची झळ बसणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाने या दरवाढीवर शिक्कामोर्तब केले असून, येत्या 21 मे पासून हे नवे दर अमलात येणार आहेत.

कुठे होणार परिणाम?
गोकुळने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कोल्हापूरसह मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत वितरित होणाऱ्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील गायीच्या दुधासाठी ही दरवाढ लागू असेल. अमूल कंपनीने तीन दिवसांपूर्वीच दुधाचे दर वाढवले होते, त्यानंतर आता गोकुळनेही त्याच पाऊलावर पाऊल टाकत दरवाढ जाहीर केल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.

हेही वाचा – Population Policy: तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर 30,000 तर चौथ्या मुलानंतर मिळणार 40,000 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

म्हशीच्या दुधाचे दर स्थिर
दिलासादायक बाब म्हणजे, गोकुळने म्हशीच्या दुधाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र, खाद्यतेल, गॅस सिलिंडर आणि भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींनंतर आता दुधासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याने गृहिणींमध्ये संतापाचे वातावरण आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे हा निर्णय घेणे भाग पडल्याचे प्रशासकीय मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number