Vijay Karur Stampede : अभिनेता थलपती विजय याच्या तामिझगा वेत्री कळगम (TVK) पक्षाच्या रॅलीत शनिवारी (27 सप्टेंबर) तामिळनाडूच्या करूर येथे मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 39 जणांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
धक्कादायक कारणे आली समोर
तामिळनाडूचे प्रभारी डीजीपी जी. वेंकटरमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरी होण्यामागे अनेक धक्कादायक कारणे समोर आली आहेत.
– थलपती विजयला पोहोचण्यास 7 तास उशीर : रॅलीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून लोक कडक उन्हात उभे होते. थलपती विजय रॅलीच्या ठिकाणी तब्बल 7 तास उशिरा (सायंकाळी 7.40 वाजता) पोहोचला. इतका मोठा उशीर झाल्याने लोकांमध्ये गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली.
– अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी: आयोजकांनी अपेक्षित लोकांची संख्या केवळ 10,000 सांगितली होती, पण रॅलीत 27,000 लोकांनी सहभाग घेतला. गर्दी अपेक्षित संख्येपेक्षा खूपच जास्त वाढली.
– अन्न आणि पाण्याची कमतरता: कडक उन्हात इतका वेळ उभ्या असलेल्या लोकांना पुरेसे पाणी आणि अन्न देखील मिळाले नाही. यामुळेही परिस्थिती बिघडली.
#WATCH | Karur, Tamil Nadu | On the Karur stampede, Additional Director General of Police (ADGP), Law and Order, S. Davidson Devasirvatham says, "…We will have to get the preliminary investigation done. Thirty-nine people have lost their lives. A case has been registered…" pic.twitter.com/6YKeWwCmUR — ANI (@ANI) September 28, 2025
हेही वाचा – TVK Vijay Rally Stampede: सुपरस्टार विजय थलापतींच्या सभेत चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 39 वर, अनेक जखमी
पोलिसांनी काय सांगितले?
वरिष्ठ पोलीस अधिकारी जी. वेंकटरमण यांनी सांगितले की, रॅलीसाठी परवानगी दुपारी 3 ते रात्री 10 दरम्यान मागितली गेली होती. पण, TVK पक्षाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर अभिनेता विजय दुपारी 12 वाजेपर्यंत रॅलीच्या ठिकाणी पोहोचेल अशी घोषणा केली, ज्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून गर्दी जमायला सुरुवात झाली. या रॅलीसाठी केवळ 500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
विजयने थांबवले भाषण, मदतीची घोषणा
अभिनेता थलपती विजयने अभिनयानंतर राजकारणात प्रवेश केला असून, तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो जोरदार तयारी करत आहे. या रॅलीदरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आणि विजयने आपले भाषण मध्येच थांबवले. यानंतरही या घटनेची आणखी चौकशी केली जाणार आहे. तसेच, चेंगराचेंगरीचे नेमके कारण काय आहे, याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.