Fire News : मध्यरात्री धावत्या स्लीपर बसमध्ये भीषण आग! 35 प्रवाशांपैकी 9 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकांच्या खिडकीतून उड्या

उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर एक अतिशय धक्कादायक आणि भीषण घटना घडलेली आहे. बुधवारी रात्री उशिरा एका स्लीपर बसने अचानक पेट घेतला आणि या अपघातात तब्बल 9 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. ही स्लीपर बस दिल्लीहून महोबाला जात होती. नक्की काय घडले?मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथून आगराच्या दिशेने जात असतानाच दयानतपूर असलेल्या गावाजवळ हा सर्व […]

Fire News : मध्यरात्री धावत्या स्लीपर बसमध्ये भीषण आग! 35 प्रवाशांपैकी 9 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकांच्या खिडकीतून उड्या
स्लीपर बसमध्ये भीषण आग,

उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर एक अतिशय धक्कादायक आणि भीषण घटना घडलेली आहे. बुधवारी रात्री उशिरा एका स्लीपर बसने अचानक पेट घेतला आणि या अपघातात तब्बल 9 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. ही स्लीपर बस दिल्लीहून महोबाला जात होती.

नक्की काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथून आगराच्या दिशेने जात असतानाच दयानतपूर असलेल्या गावाजवळ हा सर्व प्रकार घडला. बस ग्रेट ही नोएडाच्या जेवर टोलजवळ आली असतानाच बसमध्ये अचानक धूर येऊ लागला. बस चालकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने प्रसंगावधान दाखवत बस ही एक्सप्रेसवेच्या कडेला थांबवली. त्यावेळी त्या बसमध्ये तब्बल 35 प्रवासी होते. आग लागताच बसमध्ये प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.

35 प्रवाशांपैकी 9 जणांचा जागीच मृत्यू
काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. मात्र, आग इतक्या वेगाने पसरली की काही प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. ते आतच अडकले गेले. या आगीत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. ही सर्व माहिती साधारण पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी समोर आली. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण काय होते, बसमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, या सर्वांचा पोलीस तपास करत आहेत.

समोर आली धक्कादायक माहिती
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग लागल्यानंतर या बसमधून फटाके फुटल्यासारखे आवाड येत होते. त्यामुळे बसमध्ये प्रवाशांच्या सामानासोबत बेकायदेशीरपणे फटाके घेऊन जात होते का, असा संशय व्यक्त केला जात आहे. फटाक्यांमुळे आग इतक्या वेगाने पसरली असावी. आगी इतकी भीषण होती की, आगीच्या मोठ्या ज्वाळा लांबून दिसत होत्या. त्यामुळेच एक्सप्रेसवेवरुन जात असलेल्या इतर गाड्यांमध्येही भीती पसरली होती.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number