पूंछमध्ये सुरक्षा दलाची कारवाई; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

या चकमकीत सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी बजावत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती.

पूंछमध्ये सुरक्षा दलाची कारवाई; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
Edited Image

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत आज पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी बजावत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.

चकमकीचा 2 दहशतवादी ठार – 

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिले. लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती असलेल्या 3 दहशतवाद्यांपैकी दोन ठार, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. परिसरात सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे. यात ड्रोन, स्निफर डॉग्ज आणि आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे.

हेही वाचा – राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा! राजनाथ सिंह म्हणाले, 'भारत दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाण्यास तयार'

3 दिवसांत दुसरी मोठी चकमक

ही चकमक गेल्या 3 दिवसांतील दुसरी मोठी कारवाई आहे. 28 जुलै रोजी श्रीनगरमधील हरवान परिसरात, दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळ सुरक्षा दलांनी चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याचे उघड झाले होते. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हाशिम मुसा, जिब्रान आणि हमजा अफगाणी यांचा समावेश होता.

हेही वाचा – दहशतवाद्यांना शिक्षा मिळेपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण; पहलगाम हल्ल्यावरून सुप्रिया सुळे संतप्त

ऑपरेशन महादेव – 

‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः सीमेवर घुसखोरी आणि आतल्या भागातील अतिरेकी हालचालींना आळा घालण्याचे उद्दिष्ट ठेऊन सुरक्षा दल कारवाई करत आहेत. या ऑपरेशनमध्ये जम्मू-कश्मीर पोलिस, लष्कर, CRPF, आणि एनएसजी यांचा समन्वय आहे. नवीन तंत्रज्ञान, ड्रोन आणि थर्मल डिटेक्शन उपकरणांद्वारे ही शोध मोहीम राबवली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number