World’s Tallest Statue of Lord Ram: पंतप्रधान मोदी 28 नोव्हेंबरला गोव्याच्या दौऱ्यावर! जगातील सर्वात उंच भगवान राम पुतळ्याचे करणार अनावरण

दक्षिण गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान भगवान रामाच्या 77 फूट उंच भव्य कांस्य पुतळ्याचे अनावरण करतील.

World’s Tallest Statue of Lord Ram: पंतप्रधान मोदी 28 नोव्हेंबरला गोव्याच्या दौऱ्यावर! जगातील सर्वात उंच भगवान राम पुतळ्याचे करणार अनावरण

World’s Tallest Statue of Lord Ram: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कर्नाटक आणि गोव्याच्या दौऱ्यावर असून, या भेटीदरम्यान ते इतिहासात नोंद होईल असे महत्त्वपूर्ण अनावरण करणार आहेत. दक्षिण गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान भगवान रामाच्या 77 फूट उंच भव्य कांस्य पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी तयार केला आहे. याच शिल्पकारांनी गुजरातमधील जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती केली होती. ही मूर्ती जगातील सर्वात उंच भगवान रामाची मूर्ती म्हणून नोंदली जाणार आहे.

गोव्यात पंतप्रधानांचे आगमन, विशेष हेलिपॅड तयार

मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास डेम्पो यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंतप्रधान मोदी दुपारी 3:45 वाजता कार्यक्रमस्थळी दाखल होतील. त्यांच्या स्वागतासाठी मठ परिसरात खास हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे. ते प्रथम मठातील मंदिराला भेट देतील आणि त्यानंतर पुतळ्याचे अनावरण करून सार्वजनिक सभेला संबोधित करतील. या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – WinZO Money Laundering Case : विन्झो गेमिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक सौम्या सिंह आणि पावन नंदा यांना ईडीकडून अटक; 505 कोटींची मालमत्ता गोठवली

मठाच्या 550 वर्षांच्या इतिहासाचे आयोजन

संपूर्ण मठ परंपरेला 550 वर्षे पूर्ण होत असल्याने 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परतागल येथील मठ सुमारे 370 वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता आणि या कालावधीत दररोज 7  ते 10 हजार भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा – Property Stamp Duty: महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदीत घट; सवलत असूनही पुरुषांचा विश्वास कमी?

याच दौऱ्यात पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठालाही भेट देतील. येथे ते लाख कंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभागी होतील, ज्यात 1 लाख लोक एकत्र भगवद्गीतेचे पठण करणार आहेत. तसेच ते श्रीकृष्ण मंदिरासमोरील सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन, पवित्र कनकण किंडीसाठी सोन्याचे कवच (कनक कवच) समर्पित करतील.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number