पाकड्यांनी 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; कर्नल सोफिया कुरेशी यांचा खुलासा

भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी शुक्रवारी सांगितले की, प्राथमिक तपासात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यांमध्ये तुर्की ड्रोनचे अवशेष सापडले आहेत.

पाकड्यांनी 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला;  कर्नल सोफिया कुरेशी यांचा खुलासा
Edited Image

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला. पण भारताने एस-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून हे हल्ले हाणून पाडले. या घटनेशी संबंधित माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी शुक्रवारी सांगितले की, प्राथमिक तपासात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यांमध्ये तुर्की ड्रोनचे अवशेष सापडले आहेत. पाकिस्तानी सैन्याने पश्चिम सीमेवरील 36 ठिकाणी लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने आज सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल नवीन माहिती दिली. 

पाकिस्तानचा नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार – 

कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं की, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. घुसखोरीचा प्रयत्न झाला. तंगधार, उरी आणि उधारपूर येथे जोरदार गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी गोळीबारामुळे नुकसान झाले आहे. परंतु, भारतीय हवाई दलाने संयम दाखवला आहे.

हेही वाचा – 'आमचा पंतप्रधान डरपोक आहे' पाकिस्तानचे खासदार शाहिद अहमद खटक यांची शरीफ यांना चपराक

पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न – 

कर्नल सोफिया कुरेशी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, 7 आणि 8 मे च्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने संपूर्ण पश्चिम सीमेवर अनेक वेळा भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले. एवढेच नाही तर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर जड कॅलिबर शस्त्रांचाही गोळीबार केला. 36 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न करण्यासाठी सुमारे 300 ते 400 ड्रोनचा वापर करण्यात आला. भारतीय सशस्त्र दलांनी गतिज आणि गतिज नसलेल्या मार्गांचा वापर करून यापैकी अनेक ड्रोन पाडले. अशा मोठ्या प्रमाणात हवाई घुसखोरीचा संभाव्य उद्देश हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेणे आणि गुप्तचर माहिती गोळा करणे हा होता. ड्रोनच्या ढिगाऱ्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार ते तुर्की असीस्गार्ड सोंगर ड्रोन आहेत. 

हेही वाचा – ऑपरेशन सिंदूरद्वारे न्याय मिळाला; RSS प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्य

पाकिस्तानने भटिंडा येथील लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, जो निष्क्रिय करण्यात आला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा एक एडी रडार नष्ट करण्यात आला. पाकिस्तान त्यांच्या नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून करत आहे. परंतु, भारताने संयम बाळगला असून पाकिस्तानच्या एअरबस 320 ला उड्डाण करण्याची परवानगी दिली, असंही यावेळी कुरेशी यांनी नमूद केलं. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number