कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकांचा अखेरीस निकाल लागला असून काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर, राष्ट्रवादीचे घड्याळ या निवडणुकीत दणाणून पराभूत झाले आहे.
कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादीला एक टक्काही मत मिळाले नाही. राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा गमावल्यानंतर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का मिळाला आहे. राष्ट्रवादीचे कर्नाटकात घड्याळ गेलेच. राष्ट्रवादीचे एकूण नऊ उमेदवार मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभे राहिले होते. राष्ट्रवादीला अर्धा टक्का मतेही मिळाली नाहीत. राष्ट्रवादीच्या सहा उमेदवारांना काँग्रेसने हरवले. जेडीएसकडून दोन तर भाजपाकडून राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांचा पराभव झाला आहे.