मान्सूनचं रोद्र रुप दिसणार! गोवा-कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून रेड अलर्ट जारी

हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.

मान्सूनचं रोद्र रुप दिसणार! गोवा-कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून रेड अलर्ट जारी
Edited Image

Weather Alert In India: काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर आता देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते. यासाठी लोकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याच वेळी छत्तीसगड आणि ओडिशामध्ये हलक्या पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. येथे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. तथापी, पुढील एका आठवड्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळमधील मुसळधार पाऊस – 

केरळमधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने 18 जूनपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, केरळमधील त्रिशूर, पलक्कड, कन्नूर, वायनाड, मलप्पुरम, कोट्टायम, कोझिकोड, इडुक्की, एर्नाकुलम, पथनमथिट्टा आणि कासारगोड या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. 

हेही वाचा – Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; तुमच्या जिल्ह्याला कुठला अलर्ट आहे? जाणून घ्या

दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता – 

दरम्यान, हवामान विभागाने वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय दिल्लीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. तथापी, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी सकाळी दिल्लीत झालेल्या पावसामुळे लोकांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला. रविवारी दिल्लीत कमाल तापमान 41.8 अंश सेल्सिअस होते, जे सामान्य तापमानापेक्षा 1.9 अंश जास्त आहे. 

हेही वाचा – Indrayani River Bridge Collapse: ‘सत्तेचा उपयोग नेमका कशासाठी?’, इंद्रायणी दुर्घटनेवर राज ठाकरेंचा सवाल

उत्तर प्रदेशात 24 तासांत वीज पडल्याने 29 जणांचा मृत्यू – 

उत्तर प्रदेशात मान्सूनच्या आगमनापूर्वी वादळी वारे वाहू लागले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या 24 तासांत येथे नैसर्गिक आपत्तींमुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, बहुतेक मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number