Supriya Sule Meet PM Modi: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल; सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात 8 खासदार घेणार पंतप्रधान मोदींची भेट

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.

Supriya Sule Meet PM Modi: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल; सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात 8 खासदार घेणार पंतप्रधान मोदींची भेट

Supriya Sule Meet PM Modi:  महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. राज्यातील गंभीर बनलेला पाण्याचा प्रश्न आणि मतदारसंघातील प्रलंबित विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट ठरल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

‘FCRA’ विधेयकावर तीव्र आक्षेप; संयुक्त संसदीय समितीची मागणी

परकीय दानाशी संबंधित (FCRA) प्रस्तावित विधेयकावर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. हे विधेयक सध्याच्या स्वरूपात मांडल्यास त्याला पक्षाचा पूर्ण विरोध असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. परकीय निधीचा वापर केवळ चुकीच्या कामांसाठीच होतो असे मानणे योग्य नाही, कारण अनेक सामाजिक उपक्रम याच निधीतून चालतात. त्यामुळे सरकारने घाईघाईने निर्णय न घेता हे विधेयक ‘संयुक्त संसदीय समितीकडे’ (JPC) पाठवावे किंवा त्यावर खुली चर्चा घडवून आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा – CJP मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; Abhjeet Dipke यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले जात आहेत?

डिलिमिटेशन अन् ‘इंडिया’ आघाडीची रणनीती

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात ‘डिलिमिटेशन’ विधेयकाबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, हे विधेयक अजून समोर आलेले नाही. ‘इंडिया’ आघाडीची रोज सकाळी बैठक पार पडते आणि सर्व घटक पक्ष एकत्र बसूनच पुढील धोरण ठरवतात. त्यामुळे या विषयावर योग्य वेळी संयुक्त भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमाफीवरून राज्य सरकारवर हल्लाबोल

राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधताना सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकार ‘लाडकी बहीण योजने’साठी कोणतेही कडक नियम लावत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न येतो तेव्हा अटी व शर्तींचा डोंगर उभा केला जातो, असा आरोप त्यांनी केला. हे सरकार केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत असून, शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील बनले आहे, अशी सडकून टीका त्यांनी शेवटी केली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number