LPG Rationing: LPG सिलिंडरचे रेशनिंग सुरू; घरगुती ग्राहकांना मिळणार सर्वोच्च प्राधान्य; भारत पेट्रोलियमकडून मोठी अपडेट

गॅसचा तुटवडा जाणवू नये यासाठी घरगुती ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून, उपलब्ध पुरवठा काळजीपूर्वक वितरीत केला जात आहे.<br/>

LPG Rationing: LPG सिलिंडरचे रेशनिंग सुरू; घरगुती ग्राहकांना मिळणार सर्वोच्च प्राधान्य; भारत पेट्रोलियमकडून मोठी अपडेट

LPG Rationing: सध्याच्या बिघडलेल्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे आणि एलपीजी (LPG) आयातीवर आलेल्या निर्बंधांमुळे देशात इंधन पुरवठ्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी भारत पेट्रोलियमसह (BPCL) इतर तेल कंपन्यांनी एलपीजी पुरवठ्याचे ‘रेशनिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसचा तुटवडा जाणवू नये यासाठी घरगुती ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून, उपलब्ध पुरवठा काळजीपूर्वक वितरीत केला जात आहे.

तीन मोठ्या तेल कंपन्यांची संयुक्त समिती स्थापन
एलपीजीच्या वाढत्या मागणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि गरजू क्षेत्रांना पुरवठा करण्यासाठी आयओसी (IOC), बीपीसी (BPC) आणि एचपीसी (HPC) या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या एलपीजी कार्यकारी संचालकांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. विविध उद्योग आणि संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या गॅस पुरवठ्याच्या अर्जांची ही समिती बारकाईने छाननी करत आहे. ज्या संस्थांना गॅसची अत्यंत गरज आहे, अशा अर्जांचा गांभीर्याने विचार करूनच एलपीजीचे वाटप केले जात आहे. प्रत्येक अर्जाला सध्याची परिस्थिती स्पष्ट करून प्रतिसाद दिला जात असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

घरगुती ग्राहकांसाठी इंधन जतन करण्यावर भर
तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे मुख्य उद्दिष्ट हे सर्वसामान्य कुटुंबांचा स्वयंपाकाचा गॅस सुरक्षित ठेवणे हे आहे. “सर्वात आधी प्राधान्य केवळ घरगुती कुटुंबांना दिलं जाईल.,” असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यावर काही काळ मर्यादा राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा – India Energy Crisis: ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला दिलासा; ‘या’ देशाने दिली LNG पुरवठ्याची ऑफर

परिस्थिती लवकरच सामान्य होण्याची आशा
सरकार आणि संबंधित यंत्रणा एलपीजी आयातीमधील अडथळे दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. आयात केलेलं इंधन मुक्तपणे देशात पोहोचावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, लवकरच गॅस पुरवठा पूर्वपदावर येईल, अशी खात्री भारत पेट्रोलियमने दिली आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाकाबंदीचा परिणाम जाणवत आहे, तोपर्यंत उपलब्ध संसाधनांचा विवेकी वापर करण्यावर सरकारचा भर आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number