Khushboo Patani Supports Raghav Chadha: राघव चड्ढा यांची ‘आप’मध्ये कोंडी? दिशा पटानीच्या बहिणीने दिला सल्ला; म्हणाली, ‘स्वतःचा पक्ष…’

खुशबू पटानीने राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना थेट स्वतंत्र वाट निवडण्याचा सल्ला दिला आहे.

Khushboo Patani Supports Raghav Chadha: राघव चड्ढा यांची ‘आप’मध्ये कोंडी? दिशा पटानीच्या बहिणीने दिला सल्ला; म्हणाली, ‘स्वतःचा पक्ष…’

Khushboo Patani Supports Raghav Chadha : आम आदमी पार्टीच्या (AAP) राज्यसभा उपनेतेपदावरून राघव चड्ढा यांची गच्छंती झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पदमुक्तीनंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली. "माझ्या शांततेचा अर्थ पराभव समजू नका," असे म्हणत त्यांनी स्वतःची तुलना योग्य वेळी उसळणाऱ्या नदीशी केली. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर समर्थकांचा पूर आला असून, यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी हिच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

"देशाला तुमच्यासारख्या सुशिक्षित नेत्याची गरज"
खुशबू पटानीने राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना थेट स्वतंत्र वाट निवडण्याचा सल्ला दिला आहे. "तुम्ही एक सुशिक्षित आणि दूरदृष्टी असलेले नेते आहात. देशाला तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे. तुम्ही आता स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करायला हवा," अशी आग्रही भूमिका खुशबूने मांडली. जर राघव यांनी नवीन सुरुवात केली, तर लोक मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही तिने व्यक्त केला. तिची ही कमेंट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

अशोक पंडितांचा सणसणीत टोला; भूतकाळातील घटनांची करून दिली आठवण
एकीकडे समर्थन मिळत असतानाच, चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी मात्र राघव चड्ढा यांना फैलावर घेतले आहे. "जेव्हा अण्णा हजारे यांना बाजूला सारले गेले किंवा पक्षातील इतर निष्ठावंतांवर अन्याय झाला, तेव्हा तुमची ही 'नदी' का उसळली नाही?" असा बोचरा सवाल त्यांनी केला. केजरीवाल यांच्या 'शीश महाल' प्रकरणासह प्रत्येक वादग्रस्त निर्णयात साथ देणाऱ्या राघव यांनी आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असेही पंडित यांनी सुनावले.

हेही वाचा – Ramayan OTT Deal : 4000 कोटीचा चित्रपट पण 700 कोटींची ओटीटी ऑफर नाकारली, 'रामायण'च्या निर्मात्यांचा धक्कादायक निर्णय

काय आहे नेमकं प्रकरण? 
राघव चड्ढा यांच्या जागी आता खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेतील उपनेतेपदी वर्णी लागली आहे. राघव चड्ढा गेल्या काही काळापासून पक्षाच्या मुख्य प्रवाहात दिसत नसल्याने आणि त्यांच्या लंडन दौऱ्यावरून आधीच तर्कवितर्क लढवले जात होते. आता या पदमुक्तीमुळे राघव चड्ढा आगामी काळात 'आप'मध्येच राहणार की नवा राजकीय प्रवास सुरू करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number