इंडिगोला मिळाले नवे अध्यक्ष! माजी IAS विक्रम सिंग मेहता यांनी स्विकारला पदभार

इंडिगोने विक्रम सिंग मेहता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. मेहता हे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांना कॉर्पोरेट आणि प्रशासकीय जगाची सखोल समज आहे.

इंडिगोला मिळाले नवे अध्यक्ष! माजी IAS विक्रम सिंग मेहता यांनी स्विकारला पदभार
Edited Image

New Chairman of IndiGo: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने विक्रम सिंग मेहता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. मेहता हे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांना कॉर्पोरेट आणि प्रशासकीय जगाची सखोल समज आहे. यापूर्वी ते शेल ग्रुप ऑफ कंपनीज इंडियाचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच त्यांनी इजिप्तमधील शेल मार्केट्स आणि शेल केमिकल्सचे सीईओ अशा आंतरराष्ट्रीय पदांवरही काम केले आहे. आता ते इंडिगोचे माजी अध्यक्ष वेंकट सुमंतरन यांची जागा घेतील, ज्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला होता.

हेही वाचा – शत्रूवर भारी पडणार 'सूर्या रडार'! हवेतचं पाडणार शत्रूचे स्टील्थ लढाऊ विमान

इंडिगोने बुधवारी घोषणा केली की, ते ऑगस्टमध्ये नवी मुंबई येथे बांधल्या जाणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांचे पहिले व्यावसायिक उड्डाण सुरू करणार आहेत. या विमानतळावरून काम सुरू करणारी ही देशातील पहिली विमान कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मुंबई क्षेत्रातील हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यात हे विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावेल. 

हेही वाचा – मोठा अपघात टळला! आंध्र प्रदेशात मालगाडीचे 25 डबे रुळावरून घसरले

इंडिगोच्या महसुलातही मोठी वाढ – 

दरम्यान, जानेवारी ते मार्च 2025 या तिमाहीत इंडिगोचा एकूण महसूल वार्षिक आधारावर 24% वाढून 22,152 कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 17,825 कोटी रुपये होता. कंपनीने 21 मे रोजी तिमाही आणि वार्षिक आर्थिक निकाल जाहीर केले, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की हवाई प्रवास क्षेत्रातील वसुली आणि मागणी दोन्ही वेगाने वाढत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number